राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर पोटनिवडणूक कधी ? ; निवडणूक आयुक्तांनी दिले ‘हे’ उत्तर

राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर पोटनिवडणूक कधी ? ; निवडणूक आयुक्तांनी दिले ‘हे’ उत्तर

मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा रद्द झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Disqualified) यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने अधिसूचना काढून त्यांची खासदारकी रद्द केली आहे. या निर्णयामुळे आता वायनाड मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुका घेणे क्रमप्राप्त राहणार आहेत. या निवडणुका कधी होतील याचे उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीवकुमार यांनी दिले आहे.

निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यावेळ राहुल गांधींच्या अपात्रतेमुळे वायनाड येथे पोटनिवडणूक कधी लागणार ?  असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राजीवकुमार म्हणाले,  जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक जाहीर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी असतो. न्यायालयाने तीस दिवसांचा वेळ दिला आहे. कोणतीही घाई नाही असे त्यांनी सांगितले.

Karnataka Assembly Elections: कर्नाटकचे जातीय समीकरण काय आहे, जेडीएस पुन्हा किंगमेकर होऊ शकेल का? जाणून घ्या…

दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर 24 तासांच्या आतच लोकसभा अध्यक्षांनी अधिसूचना काढत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे काँग्रेस पक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. काँग्रेसने बिर्ला यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी चालविली आहे. यासाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठकही झाली आहे. साधारण सोमवारी हा अविश्वास ठराव आणला जाईल, अशी शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी 18-18 तास अदाणींसाठी काम करतात; कॉंग्रेसच्या पवन खेडा आक्रमक

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने देशभरात आंदोलन पुकारले आहे. अन्य विरोधी पक्षांनाही सोबत येण्याचे आवाहन केले आहे. तसेच लोकसभेतही या मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पद्धतीने सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसने यावर आंदोलनही सुरू केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube