Share Market Today : आज शेअर बाजारात संथ गतीने व्यवहार सुरू झाले आहेत. सेन्सेक्स सुमारे 290 अंकांनी घसरला आणि 85,300 च्या वर उघडला आहे. त्याचवेळी निफ्टीही 60 अंकांनी घसरून 26,100 च्या वर धावत होता. बँक निफ्टी 200 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 53,600 वर उघडला. (Market) तसंच, हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, इन्फोईज, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया यांसारखे शेअर्स घसरले होते. मेटल इंडेक्समध्ये सुमारे 1.5%ची वाढ झाली आहे.
शेअर बाजार नेमका कधी बंद असणार?
येत्या 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्यामुळे बीएसई हॉलिडे कॅलेंडर लिस्ट 2024 नुसार या दिवश शेअर बाजार बंद असेल. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी दिवळी हा सण आहे. त्यामुळे या दिवशीदेखील शेअर बाजारावर कोणताही व्यवहार होणार नाही. 15 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती आहे. या दिवशीदेखील शेअर बाजार बंद असेल. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी ख्रिसमास आहे. त्यामुळे या दिवशीदेखील शेअर बाजार बंद असेल. 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीनित्त स्पेशल ट्रेडिंग सेशन असेल. या स्पेशल ट्रेडिंग सेशनची नेमकी वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Maharashtra Rain Alert : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज
सध्या शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळथ आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार या वर्षांच्या शेवटपर्यंत शेअर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा 90 हजारांचा टप्पा पार करू शकतो. शुक्रवारी मात्र सेनेक्समध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मात्र शुक्रवारी सत्रादरम्यान सेन्सेक्स 85978.25 अंकांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचलाह होता. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स 264.27 अंकांच्या घसरणीसह 85,571.85 अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बजाराचा निफ्टी हा निर्देशांकदेखील दिवसाअखेर 37 अंकांच्या घसरणीसह 26,178.95 अंकांवर बंद झाला.