Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी संथ; फार्मा आणि मेटल शेअर्स वाढले
Share Market : आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात थोडीशी सुस्त होती. (Share Market) सेन्सेक्स आणि निफ्टी लाल आणि हिरव्या चिन्हांमध्ये फिरताना दिसले. मात्र, उघडताच सेन्सेक्सने नवा विक्रमी उच्चांक गाठला. निर्देशांक 85,800 च्या वर व्यवहार करत होता. त्याच वेळी निफ्टी 25,222 च्या आसपास होता. बँक निफ्टी जवळपास 118 अंकांनी 54,200 च्या वर होता. आज आयटी, मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये वाढ झाली.
जागतिक बाजारात तेजी कायम
गुरुवारी अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाले. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.62 टक्क्यांनी वाढून बंद झाला. S&P 500 निर्देशांक 0.40 टक्क्यांनी वाढला आणि टेक-केंद्रित निर्देशांक Nasdaq 0.60 टक्क्यांनी वाढला. आज शुक्रवारी आशियाई बाजारात संमिश्र कल आहे. जपानचा Nikkei 0.52 टक्क्यांनी वर आहे, तर Topix 0.23 टक्क्यांनी घसरला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.18 टक्के आणि कोस्डॅक 0.15 टक्के घसरला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक चांगली सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
रघुराम राजन यांच्याकडून केंद्र सरकारचं अभिनंदन; तर या क्षेत्रात अधिक काम करण्याचा दिला सल्ला
सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्सवरील जवळपास निम्मे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या सत्रात आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. सुमारे 2.60 टक्क्यांनी इन्फोसिस सर्वात तेजीत आहे. टेक महिंद्राही अडीच टक्क्यांहून अधिक वर आहे. HCL Tech आणि TCS चे शेअर्स देखील 2 टक्क्यांपेक्षा जास्त नफ्यात आहेत. दुसरीकडे, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये सर्वाधिक 2.27 टक्के, एल अँड टी सुमारे 2 टक्के आणि भारती एअरटेल सुमारे 2 टक्क्यांनी घसरले आहे.
या आठवड्यात नवे रेकॉर्ड झाले
देशांतर्गत शेअर बाजाराने या आठवडयात सातत्याने नवे उच्चांक नोंदवले आहेत. आठवडा बाजाराने नव्या उच्चांकासह सुरुवात केली होती. काल, गुरुवारीही रेकॉर्ड बनवण्याची प्रक्रिया सुरू होती. गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्सने 85,930.43 अंकांची तर निफ्टीने 26,250.90 अंकांची नवीन उच्चांकी पातळी गाठली. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स 666.25 अंकांच्या (0.78 टक्के) वाढीसह 85,836.12 अंकांवर आणि निफ्टी 211.90 अंकांच्या (0.81 टक्के) वाढीसह 26,216.05 अंकांवर बंद झाला.