रघुराम राजन यांच्याकडून केंद्र सरकारचं अभिनंदन; तर ‘या’ क्षेत्रात अधिक काम करण्याचा दिला सल्ला

  • Written By: Published:
रघुराम राजन यांच्याकडून केंद्र सरकारचं अभिनंदन; तर ‘या’ क्षेत्रात अधिक काम करण्याचा दिला सल्ला

Raghuram Rajan : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केलं आहे. (Raghuram Rajan ) राजन म्हणाले, गेल्या 10 वर्षांत भारताने पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. परंतु, देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर क्षेत्रांमध्ये अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

मेक इन इंडियाचे केले कौतुक

रघुराम राजन यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर सरकारचे लक्ष हे योग्य पाऊल आहे. परंतु, हे काम योग्यरित्या पार पाडणे देखील महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना रघुराम राजन म्हणाले, मी म्हणेन की हेतू चांगला आहे. पायाभूत सुविधांसारख्या काही क्षेत्रात आपण बरेच काही केले आहे असे मला वाटते.

परवानगीशिवाय CBI ला राज्यात नो एंट्री; कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ रोजी भारत विकसित राष्ट्र बनलेले असेल, असे ध्येय ठेवलेले आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता रघुराम राजन म्हणाले होते की, हे ध्येय मूर्खपणाचे आहे. जर देशातल्या मुलांना माध्यमिक शिक्षण मिळत नसेल, अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यापासून वंचित राहत असतील, तर हे ध्येय गाठता येणार नाही.

मनष्यबळानुसार काम

‘आपल्याकडे प्रचंड मनुष्यबळ आहे. पण या मनुष्यबळाच्या हाताला काम दिले नाही, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे भारताला सर्वातआधी या मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करून त्यांना काम करण्यासाठी तयार करावे लागेल आणि त्यानंतर त्यांना रोजगारही उपलब्ध करून द्यावा लागेल’, असं रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube