भाजपने केरळमध्ये रचला इतिहास; तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत पहिल्यांदा महापौर

Thiruvananthapuram Municipal Corporation : केरळमध्ये भाजपने इतिहास रचला असून तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपचा पहिल्यांदा महापौर झाला आहे

Thiruvananthapuram Municipal Corporation

Thiruvananthapuram Municipal Corporation

Thiruvananthapuram Municipal Corporation : केरळमध्ये भाजपने इतिहास रचला असून तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपचा पहिल्यांदा महापौर झाला आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेचे भाजपचे पहिले महापौर म्हणून ज्येष्ठ भाजप नेते व्ही.व्ही. राजेश यांची निवड झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात म्हणाले की, आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ. सर्व 101 वॉर्डांमध्ये विकास केला जाईल… तिरुवनंतपुरमचे रूपांतर एका विकसित शहरात होईल. डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 50  जागा जिंकल्या आहे.

शुक्रवारी सकाळी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत (Thiruvananthapuram Municipal Corporation) व्ही.व्ही. राजेश (V.V. Rajesh) यांना 51 मते मिळाली होती. त्यांना एका अपक्ष नगरसेवकाचा (एम. राधाकृष्णन) पाठिंबा मिळाला, तर एका अपक्ष नगरसेवकाने मतदानात भाग घेलता नसल्याने 100 सदस्यांच्या सभागृहात त्यांना 51 मतांचे बहुमत मिळाले. तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या सीपीआयएमचे आरपी शिवाजी यांना 29 मते मिळाली आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचे केएस सबरीनाथन यांना 19 मते मिळाली.

व्ही.व्ही. राजेश यांची महापौरपदी नियुक्ती झाल्याने केरळमध्ये अनेक चर्चांनाा उधान आले आहे. पुढील सहा महिन्यात केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी चांगली राहील्याने विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे यापूर्वी भाजपला कधीही एकही जागा जिंकता आलेली नव्हती मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भिनेते सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघात बाजी मारली होती. तर आता तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकी भाजपने शानदार कामगिरी केली आहे.

मिर्झापूर ते रक्तांचल: ‘त्या’ वेब सिरीज ज्या तिसऱ्या सीझननंतरही थांबल्या नाहीत-

सीपीएमची 45 वर्षांची सत्ता  

सीपीएमने गेल्या 45 वर्षांपासून तिरुवनंतपुरम महानगरपालिका ताब्यात ठेवली होती. भाजपच्या या विजयामुळे ती परंपराच मोडली नाही तर दक्षिणेकडील राज्यात भाजपची पकडही मजबूत झाली आहे. शपथविधी सोहळ्यानंतर केरळ भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणाले की, सीपीएम आणि काँग्रेसने मिळून शहराला मागे ढकलले आहे. त्यांनी आरोप केला की महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Exit mobile version