Download App

राखी बांधल्यावर ओवाळणीत 21 हजार देण्यास विरोध : तीन बहिणींची वहिनीला जबर मारहाण

दिल्ली : रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्या बदल्यात, भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. या काळात भाऊ आपल्या बहिणीला काही भेटवस्तू किंवा ओवाळणी देत असतो, जी गोष्ट भाऊ देईल त्याचा ती आनंदाने स्वीकार करते. (Three sisters beat up brother’s wife for not paying Rs 21,000 in Raksha Bandhan)

मात्र याच रक्षाबंधनाला ओवाळणीत 21 हजार रुपयांची न दिल्याने तिघा बहिणींनी भावाच्या बायकोला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.  दिल्लीतील मैदानगढी भागातील ही घटना आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, एक महिला मैदानगढी भागात राहते आणि ती नर्सिंगचे काम करते. रक्षाबंधनानिमित्त तिच्या पतीच्या बहिणी भावाला राखी बांधण्यासाठी घरी आल्या. आधी राखी बांधण्यावरून वादावादी झाली आणि नंतर बहिणींनी भावाकडे 21-21 हजार रुपये ओवाळणी मागितली.

अॅड. हरीश साळवे 68 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर; त्रिनाशी लंडनमध्ये विवाहबद्ध

एवढ्या मोठ्या रकमेच्या ओवाळणीला पत्नीने विरोध केला. यानंतर बहिणी आणि पत्नीमध्ये वादावादीला सुरुवात झाली. प्रकरण इतके वाढले की, बहिणींनी भावासमोरच पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर पीडित महिलेने पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला असता इतर महिला नातेवाईकांनीही तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. दोनवेळा झालेल्या या मारहाणीमुळे महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मैदानगढी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

Tags

follow us