Download App

‘तिरुपती’नंतर आता ‘यूपी’तील मंदिरात प्रसादाचा वाद.. वाचा बांके बिहारी मंदिराचा पूर्ण रिपोर्ट..

उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातील (Banke Bihari Temple) प्रसादावरून घमासान सुरू झाले आहे.

Banke Bihari Temple : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांची (Tirupati Laddu Row) चरबी असल्याचे उघड झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणी रोजच नवनवीन खुलासे होत आहेत. हिंदू संघटना आणि संत समाज या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत केली आहे. दुसरीकडे तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji) शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी देखील हा वाद थांबण्याचे नाव घेत नाही.

आता अशीच प्रकरणे देशातील अन्य मंदिरांतही दिसून येत आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातील (Banke Bihari Temple) प्रसादावरून घमासान सुरू झाले आहे. वृंदावन येथे प्रसाद तयार करण्यासाठी खराब दर्जाच्या खव्याचा वापर केला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. मंदिरतील पेढ्यांत भेसळ असल्याचा खुलासा समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) खासदार डिंपल यादव यांनी केला आहे.

डिंपल यादव यांनी केला खुलासा

बांके बिहारी मंदिरात देवाला पेढ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. या पेढ्यांत भेसळ असल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव यांनी (Dimple Yadav) केला आहे. मथुरा वृंदावनात बांके बिहारीच्या दरबारात दर्शनासाठी रोज जवळपास 50 हजार भाविक येत असतात. 162 वर्षे जुन्या असलेल्या या मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी विदेशातूनही भाविक येत असतात. येथे येणारा प्रत्येक भाविक पेढे घेतल्याशिवाय माघारी फिरत नाही. परंतु आता या प्रसादातही भेसळ असल्याचा  आरोप होऊ लागल्याने भाविकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Tirupati Controversy : तिरुपती ‘लाडू’त चरबी! जाणून घ्या, कसा तयार केला जातो लाडू प्रसादम्..

मथुरेतील पेढ्यांची तपासणी सुरू

या वादात भाजपाचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांनीही उडी घेतली आहे. उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यात मिळणाऱ्या तुपाची तपासणी व्हायला हवी. या प्रकरणी दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रकारानंतर मथुरेतील पेढ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश फूड सेफ्टी अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने मथुरा, वृंदावन आणि गोवर्धन मंदिरांतील प्रसादाचे 13 नमुने गोळा केले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल साधारण पंधरा दिवसांनंतर मिळेल असे सांगण्यात आले.

मनकामेश्वर मंदिरात बाहेरचा प्रसाद बंद

तिरुपती मंदिरातून सुरू झालेल्या या वादाचा परिणाम असा झाला की लखनऊमधील मनकामेश्वर मंदिराच्या गर्भगृहात बाहेरील प्रसाद आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती देणारे फलक मंदीर परिसरात लावण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सोमवारी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादात जिवंत उंदीर आढळून आल्याचा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल झाला होता.

प्रसादातूनही ‘तिरुपती’ला कोट्यावधींची कमाई; एका लाडूची किंमत ऐकून व्हाल थक्क!

follow us