Tirupati Laddu Controversy : तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Tirumala Balaji) प्रसादावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच आता या प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (N Chandrababu Naidu) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व मंदिरांमध्ये लवकरच ‘स्वच्छता मोहीम’ राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तेलगू देसम पक्षाच्या (TDP) कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री नायडू यांनी ही घोषणा केली आहे. तसेच धार्मिक भावनांचा आदर राज्य सरकार करणार असं देखील ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात जनावरांच्या चरबीच्या भेसळीच्या आरोपानंतर सरकार पुजारी आणि हिंदू धर्मातील इतर शीर्ष तज्ञांशी सल्लामसलत करेल आणि सल्लामसलत केल्यानंतर सरकार तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) निर्णय घेणार जे तिरुपती येथील जगप्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे अधिकृत संरक्षक आहे.
काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री नायडूने वायएसआरसीपी सरकारने श्री वेंकटेश्वर मंदिराला देखील सोडले नाही आणि भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर केला असा धक्कादायक आरोप केला होता. त्यानंतर सध्या या प्रकरणावरून देशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, अनेकांनी चांगला प्रसाद बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अपयशी ठरले.अयोध्येतही तिरुमलासारखे लाडू बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी कारागीरही इथून नेले, पण ते जमले नाही. अयोध्येतील लोकांनी मला ही माहिती दिली असं नायडू म्हणाले.
भारताने रचला इतिहास, Chess Olympiad 2024 मध्ये जिंकले सुवर्णपदक
तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी लाडूच्या प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर आणि लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या NDDB प्रयोगशाळेच्या अहवालाचे खंडन केल्याने जोरदार टीका करत 320 रुपये किलोपेक्षा कमी किमतीत गायीचे तूप कसे खरेदी करता येईल? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांना विचारला.