Download App

Mahua Moitra : ‘सरकारी बंगला तत्काळ सोडा, नाहीतर’.. खासदारकी गेलेल्या मोईत्रांना केंद्राची नोटीस

Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात आपली खासदारकी गमावून बसलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. खासदारकी गेल्यानंतर त्यांना आता सरकारी बंगला (Cash For Query) ताबडतोब सोडावा लागणार आहे. बंगला रिकामा करण्याची नोटीस मोईत्रांना पाठवण्यात आली असून बंगला तत्काळ रिकामा करावा असे या नोटिसीत म्हटले आहे. मोईत्रा सध्या याच सरकारी बंगल्यात राहत आहेत. बंगला रिकामा करण्याची नोटीस संपदा संचालयाने दिली आहे.

जर मोईत्रा यांनी बंगला सोडला नाही तर मात्र बंगला जबरदस्तीने रिकामा करून घेतला जाईल. गरज वाटल्यास बळप्रयोगही केला जाऊ शकतो, असा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. खासदारकी गेल्यानंतर खासदारांना मिळालेला बंगला त्यांना तत्काळ सोडावा लागतो. मात्र महुआ मोईत्रा खासदारकी गेल्यानंतरही याच बंगल्यात राहत आहेत.

खासदारकी गेलीयं आता Mahua Moitra नेमकं काय करणार? पाच पर्याय आले समोर

तसं पाहिलं तर बंगला रिकामा करण्यासाठी मोईत्रांना याआधीही नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याआधी 7 जानेवारी रोजी त्यांना बंगला सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नोटिस पाठवण्यात आली. तीन दिवसात बंगला का सोडला नाही याचे उत्तर या नोटिसीद्वारे मागण्यात आले होते. त्यानंतर 12 जानेवारीला पुन्हा दुसरी नोटिस धाडण्यात आली.

बंगला सोडावा लागू नये यासाठी मोईत्रा यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी संपदा निदेशालयाला बंगल्यात राहू देण्याबाबत विनंती करा असे कोर्टाने महुआ मोईत्रा यांना सांगितले होते. काही आपत्कालीन परिस्थितीत काही शुल्क देऊन सहा महिन्यांपर्यंत सरकारी बंगल्यात राहण्याची परवानगी संबंधित अधिकारी देतात, असे स्पष्ट करत न्यायालयाने मोईत्रा यांना संपदा संचालयाकडे जाण्याचे सांगितले होते.

काय आहे प्रकरण ? 

संंसदेत सरकारला प्रश्न विचारण्याच्या मोबद्ल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप खासदार मोईत्रा यांच्यावर आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मोईत्रा यांनी लोकसभेच्या वेवसाइटवरील त्यांचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड हिरानंदानी यांना शेअर केल्याचे मान्य केले होते. तसेच जर रोख स्वरुपात पैसे दिले जात असतील तर त्याची तारीख आणि संबंधित पुरावे देखील सादर करा, असे आव्हान खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले होते.

follow us