खासदारकी रद्द होताच महुआ मोईत्रांची SC मध्ये धाव; म्हणाल्या, ‘समितीला अधिकारच..,’

खासदारकी रद्द होताच महुआ मोईत्रांची SC मध्ये धाव; म्हणाल्या, ‘समितीला अधिकारच..,’

Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरणी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. ससंदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी या प्रकरणी आवाज उठवल्याने महुआ यांची खासदारी रद्द करण्यात आलीयं. त्यावरुन चांगलच वातावरण तापल्याचं दिसून आलं आहे. आता महुआ मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिक दाखल केली आहे. आचार समितीला खासदारकी रद्द करण्याचा अधिकारच नसल्याचा युक्तिवाद मोईत्रा यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Session: तुम्ही भिकारचोट योजना आणतायत; बच्चू कडू सरकारवर तुटून पडले

महुआ मोईत्रा म्हणालया, उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. हिरानंदानी आणि त्यांचे सहकारी जय अनंत देहादराई यांची उलटतपासणी न करू दिल्याबद्दल मोईत्रा यांनी नाराजी व्यक्त केली. मोइत्रा यांच्या हकालपट्टीसाठी समितीची शिफारस हिरानंदानी यांच्या विधानावर आधारित होती.

बॉलिवूडचा खिलाडी, सिंघम अन् किंग खान केंद्राच्या रडारवर; तंबाखूच्या जाहिरातीसाठी थेट धाडली नोटीस

यामध्ये मोईत्रांनी अदानी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला होता. पोर्टलवर त्यांचे प्रश्न टाईप करण्यास मदत करण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना लॉगिन पासवर्ड दिले आहेत असे सांगून मोईत्रा यांनी स्वतःचा बचाव केला आहे. तसेच महुआ मोइत्रा यांनी सत्ताधारी भाजपवरही टीका केली, पुढील तीन दशके त्यांच्याशी लढा देण्याची शपथ घेतली असून संसदेत अल्पसंख्याक आणि महिलांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

‘कांद्याचा वांदा’ : महायुतीसाठी ‘7 लोकसभा अन् 32 विधानसभा मतदारसंघात’ धोक्याची घंटा

आचार समितीने नोव्हेंबरमध्ये महुआ मोइत्रांसोबत झालेल्या वादळी बैठकीनंतर लगेचच त्यांना काढून टाकण्याची शिफारस केली होती, महुआ मोईत्रांवर प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. या समितीचा अहवाल ८ डिसेंबर रोजी लोकसभेत मांडण्यात आला आणि त्याच दिवशी संसदेतही त्यावर मतदान झाले. गदारोळात झालेल्या मतदानानंतर महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

खासदारकी रद्द झाल्यानंतर मोईत्रा यांनी सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवला. मोईत्रा म्हणाल्या, पुढील 30 वर्षे लढत राहणार असून रमेश बिधुरी यांनी संसदेत उभे असताना दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. भाजपच्या 303 खासदारांमध्ये एकही मुस्लिम खासदार नाही. बिधुरी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असं महुआ मोईत्रा म्हणाल्या होत्या. तसेच तुम्ही दानिश अलीला शिवीगाळ करता, तुम्ही अल्पसंख्याकांचा तिरस्कार करता, तुम्ही महिलांचा द्वेष करता, तुम्ही स्त्री शक्तीचा तिरस्कार करता, असंही मोईत्रा यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube