मोठी बातमी : कॅश फॉर क्‍वेरी प्रकरणात महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द

  • Written By: Published:
मोठी बातमी :  कॅश फॉर क्‍वेरी प्रकरणात महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द

Mahua Moitra : कॅश फॉर क्‍वेरी (cash for query) प्रकरणात ममता बॅनर्जींच्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात लोकसभेत ठराव मंजूर करण्यात आला. या कारवाईला विरोध करणाऱ्या खासदारांनी सभागृहात गदारोळ केला. महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ सर्व विरोधी खासदार संसद भवनाबाहेर आले आहेत. यामध्ये सोनिया गांधी यांचाही सहभाग होता.

तत्पूर्वी लोकसभेच्या आचार समितीच्या अहवालावर अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी मोईत्रा यांना बोलण्याची संधी दिली नाही. ते म्हणाले की, मोईत्रा यांनी समितीसमोर आपले म्हणणे मांडले आहे.

महुआ मोईत्रा काय म्हणाल्या?
संसद सदस्यत्व रद्द करण्याबाबत मोईत्रा म्हणाल्या की, मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यामुळे मला संसदेच्या सदस्यत्वातून बडतर्फ करण्यात आले आहे. एथिक्स कमिटीसमोर माझ्याविरुद्ध कोणताही मुद्दा नव्हता, कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता.

कर चुकवल्याप्रकरणी जो बायडेन यांचा मुलगा हंटर अडचणीत; विरोधकांनी चांगलच घेरलं

TMC चा हल्लाबोल?
लोकसभेतील चर्चेत भाग घेताना टीएमसीच्या खासदार कल्याणा बॅनर्जी म्हणाल्या की, हे नियम आणि संविधानाच्या विरोधात होत आहे. महुआ मोईत्रा यांना बोलण्याची संधी द्यावी. तर भाजप खासदारांनी राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे.

Stock Market : RBI चा निर्णय पावला! ‘निफ्टी’चा नवा पत्ता 21000; सेन्सेक्सचीही घोडदौड

काँग्रेसची भाजपवर टीका
महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील एथिक्स कमिटीच्या अहवालावर लोकसभेत घाईघाईने चर्चा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. हे ‘नैसर्गिक न्याय’ तत्त्वाचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. अहवाल वाचण्यासाठी सदस्यांना तीन-चार दिवसांचा अवधी दिला असता तर ‘आभाळ कोसळले नसते’.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube