तुम्ही जर अभिषेकसोबत असाल तर मी… खासदार कल्याण बॅनर्जींचा ममतांना अल्टिमेटम

Kalyan Banergees altimatum to Mamata Banergee तृणमूलच्या दोन खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता खासदार कल्याण बॅनर्जींनी ममतांना अल्टिमेटम दिला.

Kalyan Banergees Altimatum To Mamata Banergee

Kalyan Banergees Altimatum To Mamata Banergee

TMC MP Kalyan Banergees altimatum to Mamata Banergee for backing to Abhishek Banergee : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या (TMC) पक्षात अंतर्गत फूट सुरूच आहे. बुधवारी राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी पक्षाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. गेल्या तीन दिवसांत तृणमूल काँग्रेसच्या दोन राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडला आहे. त्यानंतर आता खासदार कल्याण बॅनर्जी यांनी देखील ममतांना अल्टिमेटम दिला आहे.

खासदार कल्याण बॅनर्जींचा ममतांना अल्टिमेटम

तृणमूल काँग्रेसमधील फुटी दरम्यान आता खासदार कल्याण बॅनर्जी यांनी देखील बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यांनी ममतांना थेट अल्टिमेटम देत धर्मसंकटात टाकले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मी ममता बॅनर्जींसोबत आहे पण पक्षामध्ये एकतर अभिषेक बॅनर्जी राहतील किंवा मी तरी राहिल. हे त्यांनी ठरवायचं आहे. कारण अभिषेकमुळेच पक्ष तुटत आहे. त्यांच्यामुळे पक्ष पुढे जाऊ शकत नाही.

‘ऑपरेशन माघार’: नाशिक विधान परिषदेतून गोकुळ गीतेंनी तलवार म्यान करण्याची कारण काय?

दुसरीकडं टीएमसीचे लोकसभेतील २८ पैकी २० खासदार आणि राज्यसभेचे १३ पैकी दोन खासदार मिळून एकूण २२ खासदार फुटले आहेत. ३ जून रोजी पश्चिम बंगालमधील ८० पैकी ५८ आमदारांनी ऋतब्रता यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी ऋतब्रता यांना विरोधी पक्षनेते बनवण्याची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडं केली. त्यातच ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. एक दिवसाआधी ममता यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

उदय सामंतांच्या मिशनला यश, आठ दिवसांच्या मनधरणीनंतर गोकुळ गितेंचे बंड थंड, नरेंद्र दराडेंचा मार्ग मोकळा

टीएमसीमध्ये बंडखोरी केलेले खासदार सयोनी घोष यांचंही नाव असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सयोनी घोष यांची सर्वाधिक चर्चा होती. सभांमधील त्यांच्या भाषणांमुळे त्यांना ममता बॅनर्जी यांचा पर्याय मानले जाऊ लागले. सयोनी या जादवपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्या २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्या. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही, अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांची टीएमसीच्या युवा शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली.

 

Exit mobile version