एकही आमदार, खासदार नसलेल्या NCPI पक्षाला लॉटरी; टीएमसीच्या खासदारांमुळे एनडीएमधील दोन नंबरचा पक्ष ठरणार

TMC-टीएमसीचे (TMC) वीस बंडखोर खासदार NCPI मध्ये विलिन होणार आहे. हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होईल आणि एनडीएमध्ये दोन नंबरचे खासदार असलेला पक्ष ठरणार आहे.

TMC MP MERGER NCPI

TMC MP MERGER NCPI

TMC Rebels set to merge with NCPI: राजकारणात कधीही राजकीय गणिते बदलतात. आता हेच बघा ना ज्या पक्षाकडे एकही खासदार, आमदार नाही. त्या पक्षात थेट वीस खासदार विलीन येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रादेशिक पक्ष असलेला व फारसे नाव नसलेला पक्ष आता देशाच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण टीएमसीचे (TMC) वीस बंडखोर खासदार NCPI मध्ये विलिन होणार आहे. हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होईल आणि एनडीएमध्ये दोन नंबरचे खासदार असलेला पक्ष ठरणार आहे.


रोजगार मागितला तर धोंड्याला मिरची लागली; रोहिणी खडसेंचा अप्रत्यक्ष टोला, शिंदे-खडसे संघर्ष पुन्हा पेटला

काही दिवसांपूर्वीपर्यंत त्रिपुरा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांबाहेर NCPI हा पक्ष लोकांना माहिती होता. या पक्षाचे पूर्ण नाव नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) असे आहे. तृणमूल काँग्रेस (TMC)च्या वीस बंडखोर खासदारांनी या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा छोटा पक्ष अचानक राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय.

एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 40 हजार कुणबी नोंदी पण…, छत्रपती शाहू महारांजाची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील काय म्हणाले?


पक्ष कोणी आणि कधी स्थापन केला ?

नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) ची स्थापना 2020 मध्ये त्रिपुराचे माजी मंत्री आणि आदिवासी नेते पबन कुमार दास यांनी केली. सुरुवातीला हा पक्ष आदिवासी कल्याण, राष्ट्रवाद आणि सुशासन या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणारा प्रादेशिक पक्ष म्हणून उभा राहिला. पक्षाचे मुख्यालय पश्चिम बंगालमधील हावडा येथे आहे. या पक्षाचा प्रभाव त्रिपुरामध्ये होता. भाजप आणि डाव्या पक्षांना पर्याय म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न होता. परंतु लोकांनी हा पक्ष स्वीकारला नाही. NCPI हा भारत निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे. अद्याप त्याला राज्य किंवा राष्ट्रीय पक्षाचा अधिकृत दर्जा मिळालेला नाही. NCPI स्वतःला राष्ट्रवादी आणि विकासाभिमुख पक्ष म्हणून सादर करतो. मजबूत राष्ट्रीय सुरक्षा, आदिवासी आणि वंचित समाजासाठी कल्याणकारी योजना, आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांचा विस्तार, भ्रष्टाचारविरोधी भूमिका. लहान समुदायांना अधिक राजकीय प्रतिनिधित्व या उद्देशासाठी हा पक्ष स्थापन झालाय.


TMCच्या बंडखोरांनी NCPI चीच निवड का केली?

तृणमूलच्या बंडखोर खासदारांनी भाजपमध्ये थेट प्रवेश करण्याऐवजी NCPI मध्ये विलीन होण्याचा मार्ग निवडला आहे. त्याचे मुख्य कारण हे थेट उजव्या विचाराच्या भाजपसारख्या पक्षामध्ये हे खासदार जाण्यास नकार देत आहे. शिवाय भाजपमध्ये थेट प्रवेश केल्यास बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप अधिक बळकट होईल. त्यावर भाजपवर राजकीय टीका टिप्पणी होईल. नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता आणि अनेक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागल्या असत्या. NCPI हा आधीपासून नोंदणीकृत पक्ष असल्याने त्याचा वापर राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या अधिक सोयीचा पर्याय ठरला आहे. बंडखोर खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी सांगितले की, आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीन होत आहोत. आम्ही तृणमूलच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक खासदारांसह बाहेर पडलो आहोत. पुढील काळात तृणमूलच्या नावावरही दावा केला जाईल आणि त्यावर अंतिम निर्णय न्यायालय घेईल.

मात्र, या विलिनीकरणानंतर पक्षातील नेतृत्वात तृणमूलमधून आलेल्या वरिष्ठ नेत्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः काकोली घोष दस्तिदार आणि इतर वरिष्ठ खासदार पक्षाच्या राष्ट्रीय विस्तारात महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. काकोली घोष दस्तिदार यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, आम्ही तृणमूल काँग्रेसमधून निवडून आलेले 20 खासदार स्वतंत्र गट म्हणून बसण्याची परवानगी मागितली आहे. आम्ही NCPI मध्ये विलीन होत आहोत आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एनडीएसोबत देशासाठी काम करू.”


एनडीएची ताकद वाढणार

NCPI चे महत्त्व केवळ पश्चिम बंगालपुरते मर्यादित राहिलेले नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी तृणमूलच्या २० खासदारांचा पाठिंबा हा मोठा राजकीय फायदा मानला जात आहे. टीएमसीचा खासदार एनसीपीआयमध्ये विलीन झाल्यास लोकसभेतील एनडीएची संख्या 294 वरून 314 वर जाईल. मात्र, घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमतापासून आघाडी अजूनही 46 जागांनी दूर राहणार आहे.


खासदारांना अपात्र ठरवावे-सिब्बल

ज्येष्ठ विधिज्ञ आणि अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांनी या घडामोडींवर तीव्र टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, टीएमसीचे बंडखोर खासदार एनसीपीआयमध्ये विलीन होणार असल्याचा दावा करत आहेत. भारतीय लोकशाही आता हास्यास्पद नाट्य बनली आहे. विधिमंडळातील गट स्वतःहून दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाही. मूळ राजकीय पक्षानेच विलयाचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे या खासदारांना अपात्र ठरवले पाहिजे.


घटनात्मक तरतूद काय सांगते?

भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार जर मूळ राजकीय पक्षा दुसऱ्या पक्षात विलीन झाला आणि त्या पक्षाच्या विधिमंडळ गटातील किमान दोन-तृतीयांश सदस्यांनी त्या विलिनीकरणाला संमती दिली, तर संबंधित सदस्यांना पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवले जाऊ शकत नाही.

Exit mobile version