केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी उलथापालथ झाली आहे. आज बाजारात झालेल्या प्रचंड विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, सेन्सेक्स 1150 अंकांनी घसरला आहे.
बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड झाल्याचे चित्र दिसतेय. जवळपास 80 ते १०० अंकांनी सेन्सेक्स घसरला. निफ् ५० हून अधिक अंकांनी खाली आला असून सध्या स्थिरावला आहे. दरम्यान, भारतात दुसऱ्यांदा रविवारी हा शेअर मार्केट सुरु राहिल आहे. याआधी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २८ फेब्रुवारी १९९९ रोजी रविवारी हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
अर्थसंकल्पात देशाची विकसीत भारताकडं वाटचाल, काय झालं स्वस्त ?
बीएसई सेन्सेक्समध्ये तब्बल 2,300 अंकांहून अधिक घसरण झाली. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री बजेट भाषण सुरू असताना सेन्सेक्स सुमारे 400 अंकांच्या तेजीमध्ये होता. मात्र भाषण संपेपर्यंत बाजाराचा सूर पूर्णपणे बदलला आणि सेन्सेक्स मोठ्या घसरणीसह खाली आला. दुपारी 12.40 वाजता सेन्सेक्स 1,035 अंक म्हणजेच 1.26 टक्क्यांनी घसरून 81,234 अंकांवर पोहोचला. त्याचवेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50 निर्देशांकही 332 अंक म्हणजेच 1.31 टक्क्यांनी घसरून 24,988 अंकांवर व्यवहार करत होता.
आज रविवार असला तरी अर्थसंकल्पामुळे शेअर बाजार सुरु होता. बाजारात सकाळी सुरुवातीला चढ-उतार पाहायला मिळाले. काही वेळासाठी बाजारात तेजीही दिसून आली. सकाळी 11.13 वाजता सेन्सेक्स 387 अंकांच्या तेजीसह 82,657 अंकांवर, तर निफ्टी 90 अंकांच्या वाढीसह 25,411 अंकांवर व्यवहार करत होता. मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने बाजार पूर्णपणे लाल रंगात गेला.
