Stock Market Holiday : आज बुधवारं (2 ऑक्टोबर 2024) भारतीय शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. आज गांधी जयंतीनिमित्त देशभरात सुट्टी असल्याने बाजारपेठा (Stock Market) आज व्यवसायासाठी खुल्या राहणार नाहीत. या कारणास्तव नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) व्यापारासाठी बंद राहणार आहेत.
आज, केवळ इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि सिक्युरिटी ट्रेडिंगच बंद राहणार नाही, तर दोन्ही सत्रांसाठी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. उद्या गुरुवार 3 ऑक्टोबरला बाजार उघडतील.
शेअर बाजाराला सुट्या
1 नोव्हेंबर (शुक्रवार) – दिवाळी
15 नोव्हेंबर (शुक्रवार)- गुरु नानक जयंती
25 डिसेंबर (बुधवार) – ख्रिसमस
MCX सुट्ट्या
1 नोव्हेंबर (शुक्रवार) – दिवाळी – पहिले सत्र बंद राहील.
15 नोव्हेंबर (शुक्रवार) – गुरु नानक जयंती – पहिले सत्र बंद राहील.
25 डिसेंबर (बुधवार) – ख्रिसमस
काल शेअर बाजार कसा होता?
स्थानिक शेअर बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या व्यापार सत्रात घसरण झाली. ऑइल आणि गॅस आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समधील विक्रीमुळे सेन्सेक्सला 33.49 अंकांचे किंचित नुकसान झालं.
Video: मोठी दुर्घटना! सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यातील बावधनमध्ये कोसळलं
बीएसईचा 30 शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 33.49 अंकांच्या किंवा 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह 84,266.29 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान, तो 84,648.40 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निर्देशांक निफ्टी देखील 13.95 अंकांच्या किंवा 0.05 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 25,796.90 अंकांवर बंद झाला.