Stock Market : शेअर बाजारात चांगली सुरुवात; निफ्टी 25,400च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

  • Written By: Published:
Stock Market : शेअर बाजारात चांगली सुरुवात; निफ्टी 25,400च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today Update : आज सोमवार (16 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. निफ्टीही 70 अंकांनी वर होता. बँक निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह 52,000 च्या वर होता.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न?, फ्लोरिडातील गोल्फ क्लबबाहेर गोळीबार

सेन्सेक्स 95 अंकांनी वाढून 82,985 वर उघडला. निफ्टी 50 अंकांनी वाढून 25,406 वर तर बँक निफ्टी 100 अंकांनी वाढून 52,038 वर उघडला. आज मेटल शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

Rain Update : राज्यात पाऊस पुन्हा होणार सक्रीय; वाचा आजचा हवामान विभागाचा अंदाज

या तीन शेअर्सकडे लक्ष

आज इंडसइंड बँक, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि टाटा स्टील या तीन शेअर्सकडे सर्वांचे लक्ष असेल. शेअर बाजारातील तज्ज्ञ सुमित बागडिया यांनी वरील तीन शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. इंडसइंड बँक: या शेअरमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तो 1464 रुपयांवर खरेदी करावा. त्यासाठी टार्गेट 1600 रुपये ठेवावे, तर स्टॉप लॉस हा 1400 रुपयांचा राहू द्यावा.

स्टॉप लॉस

या शेअरने सपोर्ट झोनपासून पुन्हा बाऊन्स केले आहे. हा शेअर 1470 रुपयांपेक्षा वर राहिला तर भविष्यात 1575 रुपये आणि 1600 रुपयांपर्यंत वाढू शकतो. तसंच, ग्रासिम इंडस्ट्रीज या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तो 2784.35 रुपयांवर खरेदी करावा. त्यासाठी टार्गेट 3015 रुपये ठेवावे तर स्टॉप लॉस 2675 रुपयांचा लावावा.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube