Tomato High Prices : टोमॅटोचे दर गगणाला भिडले आहेत. काही राज्यांमध्ये टोमॅटोचे दर 200 च्या वर पोहोचले आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरच नाही तर जिवनावरही होताना दिसत आहे. या दरवाढीचा फटका एका कुटुंबाला चांगलाच बसल्याचं पाहायला मिळत आहे. मध्यप्रदेशच्या(Madhya Pradesh) शाहडोल जिल्ह्यातील बेम्होरी गावातील रहिवासी संजीव कुमार वर्मा यांच्या कुटुंबात वादाचं कारण ठरलं आहे. संजीवने भाजीमध्ये दोन टोमॅटो टाकल्याने पत्नी रागाच्या भरात घर सोडून निघून गेली आहे. संजीवने खूप विनवणी केली तरीही ती मानली नाही आणि घर सोडून गेली, त्यानंतर मात्र पतीने आपण भाजीत टोमॅटोचा वापरच करणार नसल्याची शपथ घेतली आहे.(Tomato high prices Dispute Wife Left House Husband Put Tomato In Vegetable )
महाराष्ट्रात पॉवर गेम! राष्ट्रवादीवर टाकलेला डाव फडणवीसांवरच उलटणार
झालं असं की, सध्या टोमॅटोचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यातच संजीव वर्मा यांनी पत्नीला न विचारताच भाजीमध्ये दोन टोमॅटो वापरले. ही गोष्ट जशी पत्नीला समजली, त्यानंतर मात्र पत्नी संतापली. त्यामुळे पती-पत्नीमध्ये जोरदार राडा झाला. एवढंच नाहीतर दोघांमधील भांडण एवढं टोकाला जाऊन पोहोचलं की, पत्नीनं थेट आपल्या मुलीला घेऊन घरच सोडलं. त्यानंतर संजीवने आपल्या पत्नीचा आणि मुलीचा शोध घेतला पण त्या काही सापडल्याच नाही. त्यामुळे आता संजीवने आपल्या पत्नी आणि मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.
देशाला मिळाला नवा गौतम अदानी; सिम कार्ड विकून उभी केली कोट्यवधींची संपत्ती
पोलिसांनी संजीवकडे घर सोडून जाण्याबद्दल चौकशी केल्यावर संजीवने सांगितले की, काही दिवसांपूर्वी जेवण बनवताना आपण दोन टोमॅटोचा वापर केल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे पत्नी मुलीसोबत घर सोडून गेली. तीन दिवस झाले अद्याप त्यांचा कुठेही पत्ता लागलेला नाही.
आता पत्नी घर सोडून गेल्यामुळे संजीवने एक अजबगजब शपथ घेतली आहे. आपण यापुढे आयुष्यभर टोमॅटोचा वापरच करणार नसल्याची शपथ घेतली आहे. संजीव एक छोटासा ढाबा चालवतो. त्यासोबतच टिफिन सेवाही चालवतो. दोन-तीन दिवसांपूर्वी संजीवने पत्नीला न विचारताच भाजीमध्ये दोन टोमॅटो टाकले आणि त्यामुळे पत्नीला खूप राग आला. त्यातून वाद झाला अन् पत्नी घर सोडून निघून गेली. घर सोडून जात असताना संजीवने आपल्या पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र पत्नीनं काही ऐकलच नाही, अन् निघून गेली. आता दोन-तीन दिवस झाले पत्नीचा कुठेच पत्ता लागत नाही.
एवढं सगळं या टोमॅटोच्या दरवाढीमुळं झालं आहे. पोलिसांनी संजीवच्या पत्नीचा शोध लावला आहे. आता पोलीस या दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. संजीवच्या लग्नाला आठ वर्ष झालेले आहेत. आठ वर्षांच्या संसाराल या टोमॅटोची नजर लागली आहे. त्यामुळे आता संजीवची पत्नी त्याच्याबरोबर घरी येते की नाही हे मात्र पाहावेच लागेल.