Download App

मोठी बातमी! देशाला संबोधित करणार पंतप्रधान मोदी, ऑपरेशन सिंदूरनंतर काय बोलणार?

PM Modi Live : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई करत पाकिस्तानमधील तब्बल 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला

PM Modi Live : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई करत पाकिस्तानमधील तब्बल 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला घेतला होता. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतातील 15 शहरांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आले होते मात्र भारताने (India) आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानला (Pakistan) जोरदार प्रत्युत्तर दिले.

तर आता दोन्ही देशात वाढलेला तणाव कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज रात्री (12 मे) देशाला संबोधित करणार आहे. आज रात्री पंतप्रधान मोदी नेमकं काय? बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी पाकिस्तानकडून हल्ले करण्यात येत आहे. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी देशाला काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

तरुणांना संधी, एसटीत लवकरच नोकरभरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा 

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. भारताने पाकिस्तानसोबत असणारा सिंधू जल करार देखील रद्द केला होता आणि पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला घेतला होता.

पाकिस्तानचे ड्रोन हल्ले अन् अचानक लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीचा उल्लेख

follow us