पाकिस्तानचे ड्रोन हल्ले अन् अचानक लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीचा उल्लेख

DGMO Lieutenant General Rajiv Ghai On Virat Kohli : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई करत हवाई हल्ले केले होते. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरात हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र भारताने आपल्या एअर डिफेन्स सिस्टमच्या मदतीने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. तर दुसरीकडे आता दोन्ही देशात वाढलेला तणाव कमी होताना दिसत आहे. दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही देशांचे डीजीएमओने चर्चा केली आहे. यानंतर भारताच्या तिन्ही सैन्याच्या डीजीएमओंची पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय डीजीएमओंकडून विराट कोहली आणि अॅशेस मालिकेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देताना विराट कोहली (Virat Kohli) आणि अॅशेस मालिकेचा (Ashes Series) उल्लेख केला आहे. भारताची डिफेन्स ताकद स्पष्ट करण्यासाठी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी 1970 च्या दशकातील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असणारी अॅशेस मालिकेतील उदाहरण दिला.
#WATCH | Delhi | DGMO Lieutenant General Rajiv Ghai says, “Targetting our airfields and logistics is way too tough… I saw that Virat Kohli has just retired from test cricket; he is one of my favourites. In the 1970s, during the Ashes between Australia and England, two… pic.twitter.com/B3egs6IeOA
— ANI (@ANI) May 12, 2025
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई (Lieutenant General Rajiv Ghai) म्हणाले की, आज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसारखा तो माझा पण आवडता खेळाडू आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका सुरु होती आणि या मालिकेत दोन ऑस्ट्रेलियन फास्ट गोलंदाज जेफ थॉमसन (Jeff Thomson) आणि डेनिस लिली (Dennis Lillee) इंग्लंड फलंदाजाना खूप त्रास देत होते. त्यामुळे त्या काळात एक म्हण प्रसिद्ध झाली होती. अॅशेस ते अॅशेस, जर थॉमोने तुम्हाला पकडले नाही तर लिली तुम्हाला पकडेल. असं उदाहरण देत लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, जरी शत्रू भारताच्या एका थरातून पळून गेला तरी पुढचा ग्रिड त्याला रोखेल. भारताचे संरक्षण कवच अभेद्य आहे आणि ते तोडणे हे फक्त एक स्वप्न आहे.
लेफ्टनंट जनरल राजीव घई पुढे म्हणाले की, तुम्ही पाकिस्तान एअरफील्डची दुर्दशा आधी आणि काल पाहिली आणि आज एअर मार्शलचे सादरीकरण पाहिले. आमचे हवाई क्षेत्र सर्व बाबतीत कार्यरत आहे. आमच्या ग्रिडमुळे पाकिस्तानचा ड्रोन नष्ट झाला. येथे, मी आपल्या सीमा सुरक्षा दलाचे कौतुक करतो ज्यांच्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कारवाया उद्ध्वस्त झाल्या.
तरुणांना संधी, एसटीत लवकरच नोकरभरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेमध्ये एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. म्हणून, पाकिस्तानने ही लढाई स्वतःची लढाई बनवली, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. 7 मे रोजी आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. आम्ही पाकिस्तानला पाठवलेले ड्रोन नष्ट केले.