Train Accident In Tamil Nadu : तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) शुक्रवारी रात्री रेल्वे अपघात झाला आहे. बिहारला जाणारी बागमती एक्स्प्रेस (Bagmati Express) मालगाडीला धडकली. या अपघात अनेक जण जखमी झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे. हा अपघात सिग्नल बिघडल्याने झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
VIDEO | Mysuru-Darbhanga Express met with an accident near Kavarapettai Railway Station in the Chennai Division, causing derailment of at least two coaches. More details awaited.
(Source: Third Party) pic.twitter.com/zuwsXq14GM
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारकडे जाणारी बागमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकल्याने बागमती एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे मालगाडीला आग लागली. बागमती एक्स्प्रेस म्हैसूरहून (Mysore) बिहारमधील दरभंगा (Darbhanga) मार्गे पेरांबूरला जात होती मात्र तिरुवल्लूरजवळील कावरप्पेट्टाई रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला.
शेतकऱ्यांना दिलासा, पिक विम्याचे 44.42 कोटी बँक खात्यात जमा, आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना यश
या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी अपघातस्थळी पोहोचले असून सध्या बचावकार्यही सुरु करण्यात आला आहे. तसेच अपघातस्थळी रुग्णवाहिका आणि एनडीआरएफची टीमही पाठवण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री 8.50 च्या सुमारास घडला आहे.
माहितीनुसार, 8.27 बागमती एक्स्प्रेसने पोनेरी स्टेशन पार केले आणि मेनलाइन मार्गे पुढील स्टेशन कावराईपेट्टईला जाण्यासाठी रेल्वेला ग्रीन सिग्नल देण्यात आले होते मात्र दिलेल्या सिग्नलनुसार मेन लाइनमध्ये जाण्याऐवजी ट्रेन 75 किमी प्रतितास वेगाने लूप लाईनवर गेली आणि इतके उभी असलेल्या मालगाडीला धडकली.
त्यामुळे पुढील कोच म्हणजेच पार्सल व्हॅनला आग लागली जी अग्निशमन दलाने विझवली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे तर सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
रेल्वेने हेल्पलाइन नंबर देखील जारी केले आहेत
समस्तीपूर- 06274-81029188
दरभंगा- 06272-8210335395
चेन्नई विभागासाठी हेल्पलाइन नंबर
04425354151
04424354995