Treat Call To UP CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय. यावेळी त्यांना मुंबई पोलीस (Mumbai Police) नियंत्रण कक्षाच्या फोन नंबरवर धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री योगी यांना 10 दिवसांत राजीनामा देण्यास सांगितलं आहे. तसं न केल्यास बाबा सिद्दीकीप्रमाणे जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी आलेल्या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. फोन करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या कॉलची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्या दसऱ्याला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात क्रमांकावरून आलेल्या मेसेजद्वारे धमकी देण्यात आलीय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झालीय.
आता पैलवान उतरलाय, त्यामुळे कुस्ती खेळायचीच ; गुलाबराव पाटलांनी थोपटले दंड, जरांगे पाटलांवर म्हणाले…
या वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये सीएम योगी आदित्यनाथ यांना शनिवारी रात्री लखनौ महानगरातील नियंत्रण कक्ष सुरक्षा मुख्यालयात फोन करून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 10 वाजता अनोळखी नंबरवरून एक फोन आला होता. योगी यांना सीयूजी क्रमांकावर धमकी देण्यात आली. त्या तरुणाने फोन करून सीएम योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याचे सांगितले. कॉन्स्टेबलने कोठून फोन करतोय, अशी विचारणा केली असता तरुणाने लगेच फोन कट केला. योगींची धमकी मिळताच एकच खळबळ उडाली.
टीम इंडिया, आता जिंकायचं! दुसऱ्या डावात न्यूझीलंड १७४ वर ऑलआऊट; जडेजा चमकला
त्याचप्रमाणे डिसेंबर 2023 मध्येही सीएम योगी, श्री राम मंदिर आणि यूपी एसटीएफ प्रमुखांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. डीजीपी मुख्यालय आणि एसटीएफ मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. आयएसशी संबंधित जुबेर खान याने योगी आदित्यनाथ, एसटीएफचे तत्कालीन प्रमुख अमिताभ यश यांच्यासह इतरांना अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवला आहे. दरम्यान आता मिळालेल्या धमकीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क मोडवर आली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय.