टीम इंडिया, आता जिंकायचं! दुसऱ्या डावात न्यूझीलंड १७४ वर ऑलआऊट; जडेजा चमकला

टीम इंडिया, आता जिंकायचं! दुसऱ्या डावात न्यूझीलंड १७४ वर ऑलआऊट; जडेजा चमकला

IND vs NZ 3rd Mumbai Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी (IND vs NZ) सामन्यात भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. या सामन्यातील दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा अख्खा संघ फक्त 174 धावांत ऑल आऊट झाला. यानंतर न्यूझीलंडच्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय फलंदाज (Team India) मैदानात उतरले आहेत. या सामन्यात धावा कमी आहेत. त्यामुळे जिंकण्याची संधी आहे.  याआधीच्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. न्यूझीलंड संघाने कसोटी मालिकाही जिंकली आहे. आता तिसरा आणि शेवटचा सामना गमावला तरी किवी संघाला फारसा फरक पडणार नाही.

IND vs NZ Live : रवींद्र जडेजा अन् वॉशिंग्टन सुंदरचा दिवाळी धमाका, न्यूझीलंड 235 वर ऑलआऊट

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात विल यंगने सर्वाधिक धावा केल्या. दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने त्याने ५१ धावा केल्या. या व्यतिरिक्त अन्य कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. सहा फलंदाजांना तर दहाचा आकडाही गाठता आला नाही. या डावात न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर दडपणात येताना दिसले. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या.

भारताकडून फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. तर आर. अश्विनने तीन विकेट घेत त्याला मोलाची साथ दिली. वेगवान गोलंदाज वॉशिंग्टन सु्ंदर आणि आकाशदीप या दोघांनी एक एक विकेट घेतली. न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने २६३ धावांवर डाव संपवला. यामुळे भारताला २८ धावांची किरकोळ आघाडी मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

भारताकडून शुभमन गिलने ९० धावा केल्या. त्याचे शतक थोडक्यात हुकले. ऋषभ पंतने ६० धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने पाच विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन फिलीप्स, मॅट हेनरी आणि इश सोढी या तिघांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली. भारतीय फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. किवी फलंदाज भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे फक्त १७४ धावा करता आल्या. आता भारताला हा सामना जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. सामना जिंकण्यासाठी भारताला फक्त १४७ धावा करायच्या आहेत.

टीम इंडियाचा हेड कोच बदलणार, व्हेरी स्पेशल लक्ष्मण सांभाळणार जबाबदारी, हे आहे कारण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube