Download App

जोरदार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली राजधानी; रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद

  • Written By: Last Updated:

Earthquake tremors felt in Delhi-NCR Epicentre In Afghanistan : दिल्ली-एनसीआरसह जगाभारातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरियाणामध्येही भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले असून, भारतासह हे धक्के अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमध्येही जावल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात होते. भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. भूकंपाच्या या तीव्र धक्क्यामध्ये वित्त अथवा जिवीत हानी किती झालेली आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानच्या काही भागात 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले असून, पीएमडी म्हणजेच पाकिस्तान हवामान विभागाने भूकंपाचे केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदूकुशमध्ये असल्याचे म्हटले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून अफगाणिस्तान दोनदा सहा आणि त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपांचे धक्के जाणवले आहेत.

कशी मोजली जाते भूकंपाची तीव्रता?

रिश्टर स्केल वापरून भूकंपाचे धक्के मोजले जातात. त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल असे म्हटले जाते. साधारणात भूकंप 1 ते 9 रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाचे मोजमाप त्याच्या केंद्रस्थानावरून केले जाते. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता त्यावरून मोजली जाते, ही तीव्रता भूकंपाची तीव्रता ठरवते.

follow us

संबंधित बातम्या