Afghanistan हादरले! माजी उपराज्यपालांच्या अंत्यविधीत बॉम्बस्फोट; 15 ठार
Afghanistan Bomb Blast: अफगाणिस्तान मोठा बॉम्बस्फोटाने पुन्हा एकदा हादरले आहे. बदख्शान प्रांतात माजी उपराज्यपाल निसार अहमद अहमदी (Nisar Ahmad Ahmadi) यांच्या अंत्यसंस्कारात हा बॉम्बस्फोट झाला आहे. त्यात पंधरा नागरिक ठार झाले आहेत. तर ५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गुरुवारी बदख्यान प्रांतातील (Badakhshan province) फैजाबाद (Faizabad) येथील मशिदीत हा स्फोट झाला झाला आहे. (afghanistan-15-killed-50-injured-in-blast-near-taliban-deputy-governors-funeral)
या प्रांताच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख मजुद्दीन अहमदी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले की, बदख्शान प्रांताची राजधानी फैजाबाद येथील मशिदीत हा स्फोट झाला. फैजाबादमधील हेसा-ए-अवल भागातील नबावी मशिदीत हा स्फोट झाला. संस्कृती विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. मृत्यूचा आकडाही वाढू शकतो, असे वृत्त आहे. हा आत्मघाती हल्ला होता. या स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.
देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक OSD राजकारणात; सुमित वानखेडेंवर मोठी जबाबदारी
अहमदी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झालेल्या स्फोटात बागलानचे माजी पोलीस कमांडर सफिउल्लाह समीम यांचाही मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनी ट्विट करत मशिदीवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हा मानवी आणि मुस्लिम मुल्यांवर दहशतवादी हल्ला असल्याचे करझाई यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी निसार अहमदी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. तर सहा जण जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्याच अंत्यविधीच्या वेळी हा बॉम्बस्फोट झाला आहे.
‘Adipurush’ सिनेमाची १० हजार तिकिटे फ्री देणार! बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याचा मोठा निर्णय
अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी राजवट आहे. त्या ठिकाणी महिलांवर अनेक निर्बंध आणण्यात आलेले आहेत. मुलींच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. तर मुलींवर विषप्रयोग केले जातात, असे वृत्त या देशातून येत आहेत. भारताचा चांगला मित्र राहिलेले व शेजारी राष्ट्र असलेल्या या देशाचे तालिबानी राजवटीमुळे हाल होत आहेत. तर अफगाणिस्तानमध्ये सातत्याने होत असलेल्या बॉम्बस्फोटांनी अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत.