MP Mahua Moitra one sided love : आपल्या प्रभावी अभिनयाने प्रसिद्ध असलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. आता त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खआसदार महुआ मोईत्राही सामिल झाल्या आहेत. (Moitra) मोईत्रा यांनी सांगितलं की आपल्याला पंकज त्रिपाठी खूप आवडतात, फक्त एवढंच नाहीतर पंकज त्रिपाठींसोबत डेटवरही जायची आपली इच्छा आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा मोदी सरकारला हैराण करणारी फायरब्रँड खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. मोईत्रा यांनी त्यांची ही ‘दिल की बात’ एका पत्रातून व्यक्त केली आहे. त्यांचं हे पत्र व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महिला खासदारानं आपल्या पत्रातून खुलासा केला आहे की, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी हे त्यांचे क्रश आहेत. तसंच, त्यांच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छाही महिला खासदारानं व्यक्त केली आहे.
मी मुन्नाभाई सिनेमाची सीरिज बघितली, मी ती अनेक वेळा पाहू शकते. विक्की डोनर सिनेमाही मला आवडला. मला पंकज त्रिपाठी आवडतात. मिर्झापूरचा प्रत्येक सीन मी लक्षपूर्वक पाहिला आहे. ते सगळ्यात कूल अभिनेते आहेत, असं मला वाटतं. मिर्झापूर आणि गँग्स ऑफ वासेपूरमध्ये त्यांच्या भूमिका मला आवडल्या. मला त्यांच्या निगेटिव्ह आणि दमदार भूमिका आवडतात.
खासदार महुआ मोइत्रा दुसऱ्यांदा विवाहबंधनात; जीवनसाथी 65 वर्षीय पिनाकी मिश्रा कोण?
मी पंकज त्रिपाठींना एक पत्रही लिहिलं होतं. त्याचं उत्तर मिळालं नाही. पण, माझ्या भावना मी त्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. मी पत्रात लिहिलं होतं की, मी तुमची खूप मोठी चाहती आहे आणि तुमच्यासोबत एकदा कॉफी डेटवर जायचंय. पण, पंकज त्रिपाठी अलिबागमध्ये राहतात. त्यामुळेच कदाचित त्यांना कॉफीसाठी वेळ नसावा”, असा टोलाही महुआ मोईत्रा यांनी यावमध्ये लगावला आहे.
भेटण्यासाठी प्रयत्न केला
महुआ मोईत्रा यांना ज्यावेळी समजलं की, एक न्यूज अँकर पंकज त्रिपाठींची मुलाखत घेणार आहे, त्यावेळी त्यांनी पंकज त्रिपाठींसाठी एक पत्र लिहून त्यांना पाठवलं आणि न्यूज अँकरला त्यांना द्यायला सांगितलं. एवढंच नाहीतर, महुआ मोईत्रा यांनी पंकड त्रिपाठींपर्यंत पोहोचण्यासाठी रवि किशन यांची मदत घेतलेली. रवी किशन यांनी फोनवरुन पंकज त्रिपाठींशी महुआ यांचा संपर्क करून दिला होता. पण, महुआ लाजल्या आणि त्यामुळे त्या पंकज त्रिपाठींशी फोनवर नीट बोलू शकल्या नाहीत. पंकज त्रिपाठींना भेटण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. पण, त्यांची पंकज त्रिपाठींशी भेट झाली नाही, असंही महुआ मोईत्रा यांनी सांगितलं.