Mahua Moitra विवाहबंधनात अडकल्या; बीजेडीच्या माजी खासदाराशी जुळलं सुत…

Mahua Moitra : तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) वयाच्या 50 व्या वर्षी विवाहबंधनात अडकल्या आहेत. बीजू जनता दलाचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी मोईत्रा यांनी लग्न केलंय. जर्मनीमध्ये 3 मे रोजी त्यांनी विवाह केलायं. यासंदर्भात अद्याप अधिकृतपणे माहिती समोर आली नसून महुआ मोईत्रा आणि मिश्रा यांचा हातात हात घालून फिरतानाचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यावरुन अंदाज बांधण्यात येत आहे.
पिनाकी मिश्रा जनता दलाकडून तब्बल चार वेळा खासदार राहिलेले आहेत. ते 1996 मध्ये लोकसभेवर गेले होते. त्यानंतर 2009 पासून ते 2019 पर्यंत ते खासदार राहिले आहेत. व्हायरल फोटोमध्ये पिनाकी मिश्रा आणि महुआ मोईत्रा एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसून येत आहेत. या फोटोमध्ये महुआ यांनी सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे.
आसाममध्ये 12 ऑक्टोबर 1974 साली महुआ मोईत्रा यांचा जन्म झाला असून 2010 सालापासून त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेसमध्ये सामिल झाल्या होत्या. त्यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2024 मध्ये सुद्धा त्या लोकसभेवर गेल्या आहेत.
कारखानदार, चोर, दरोडेखोर म्हणूनच अर्थ खात… अन् अजित पवारांवर बोलताना हाकेंची जीभ घसरली
पिनाकी मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता राहिलेले आहेत. यासोबतच राजकारण आणि कायदेशीर प्रकरणांमध्ये त्यांना तीन दशकांचा अनुभव आहे. देशाच्या वित्त विभागाच्या विद्यमान समितीमध्ये सदस्य राहिलेले आहेत. लोकसभेत आपली भूमिका शांतपणे मांडणे यासाठी ते ओळखले जातात.
पिनाकी मिश्रा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1959 मध्ये झाला. लोकनाथ मिश्रा असं त्यांच्या वडिलांचं नाव असून बिनापनी मिश्रा असं त्यांच्या आईचं नाव आहे. पिनाकी मिश्रा यांनी 16 जानेवारी 1984 साली संगीत मिश्रा यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन अपत्यही आहेत. दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टीफन महाविद्यालायतून त्यांनी बीए ऑनर्स ही पदवी घेतली असून एलएलबीचंही शिक्षण घेतलंय.