अयोध्येत बस – ट्रकचा भीषण अपघात; 7 ठार तर अनेकजण जखमी

Accident News : उत्तरप्रदेशमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अयोध्येमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या प्रवाशी बसला एका ट्रकने जोरदार धडक दिली असल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही धडक इतकी […]

Untitled Design   2023 04 22T090117.159

Untitled Design 2023 04 22T090117.159

Accident News : उत्तरप्रदेशमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अयोध्येमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या प्रवाशी बसला एका ट्रकने जोरदार धडक दिली असल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भयंकर होती की ट्रक उलटून बसच्या वर पडला. त्यामुळे बस पूर्ण चक्काचूर झाली आहे.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तर ट्रक बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. हा अपघात उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये लखनऊ-गोरखपूर महामार्गावर घडला आहे.

अतिक आणि अश्रफच्या हत्येचा बदला घेणार, ‘या’ संघटनेने दिली धमकी

याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रवाशी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रक उलटा होऊन बसच्या वर पडला. या भीषण अपघात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर या जोरदार धडकेमध्ये अनेकजण अत्यंत गंभीररीत्या जखमी झाले आहे.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… पुण्यात पुन्हा झळकले अजित पवारांचे बॅनर

दरम्यान या अपघाताची माहिती समजताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Exit mobile version