Download App

Twitter ने सर्वांनाच ठणकावले, राहुल गांधी ते विराट, अमिताभ बच्चन ते रोनाल्डो अनेकांच्या ब्लू टीक गायब

Twitter Removed Blue Tick Check Mark : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यानुसार ते युझर्सकडून आता ब्लू टीकसाठी पैसे आकारणार होते. मात्र काही कारणांमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता.

मात्र अखेर मस्क यांनी युझर्सना धक्का देणारा हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आपल्याला अनेक व्हेरीफाईड अकाऊंटच्या ब्लू टीक थेट गायब झाल्याच्या पाहायला मिळत आहेत. यामध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ, दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल, क्रिकेटर विराट कोहली, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह अनेक राजकीय, चित्रपटसृष्टी आणि क्रिडा क्षेत्रातील सेलिब्रेंटींच्या व्हेरीफाईड अकाऊंटच्या ब्लू टीक ट्विटरने हटवल्या आहेत.

ट्विटरच्या नव्या नियमानुसार ट्विटर आता त्याच लोकांना ब्लू टीक देणार आहे. त्यासाठी पैसे मोजतील. 20 एप्रिलपासून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ट्विटर ट्विट करत सांगितले की, आम्ही 20 एप्रिलपासून ज्या लोकांनी ब्लू टीकसाठी पैसे दिले नाहीत त्यांचे ब्लू टीक हटवले आहेत. तसेच आपले ब्लू टीक कायम ठेवण्यासाठी साईन अप करण्यासाठी लिंक देत आहोत.

ट्विटरचा लोगो बदलण्याची रंजक कहाणी, इलॉन मस्क शब्दाला जागला

भारतात ट्विटरच्या ब्लू टिककरिता ९०० रुपये प्रति महिना शुल्क भरावा लागणार आहे. देशातील 1.2 कोटी WhatsApp यूजर्स अन् 17 लाख फेसबूक यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. ट्विटरवर असलेल्या बनावट खात्याना आळा घालण्याकरिता एलॉन मस्क यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत.

यासाठी देखील मोजावे लागणार पैसे

आता ट्विटरप्रमाणे फेसबूक व इंस्टाग्रामवर ब्ल्यू टीकसाठी देखील तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ही घोषणा केली. याअगोदर एलन मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शन लाँच करून पैसे वसूल करण्यास सुरुवात केली. यासाठी सुमारे ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.

Tags

follow us