Download App

ANI Twitter Locked: ट्विटरने ‘एएनआय’चे अकाउंट केले ब्लॉक, जाणून घ्या काय आहे कारण

  • Written By: Last Updated:

ANI Twitter Locked : देशात सर्वात मोठी वृत्तसंस्था एएनआयचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटने शनिवारी दुपारी अचानक @ANI हँडल ब्लॉक केले आहे. यानंतर या अकाउंटवर गेल्यावर, हे अकाउंट अस्तित्वात नसल्याचे दाखवण्यात येत आहे. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्वीट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे.

प्रकाश यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत याची माहिती दिली आहे की, ट्विटरने अकाउंट तयार करणाऱ्याचे किमान वय १३ वर्षे असण्याचा नियम नमूद केला आहे. त्यांनी ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनाही टॅग केले आहे. पुढच्या ट्विटमध्ये स्मिता यांनी सांगितले आहे की, ‘आम्ही १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे नाही!’

Tags

follow us