आजपासून ‘नोटबदली’ मात्र बँकांमध्ये दिसली भलतीच परिस्थिती

RBI Withdraws Rs 2000 Currency Note : आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून बाद केली आहे. सप्टेंबरनंतर दोन हजारांची नोट ही चलन म्हणून स्वीकारली जाणार नाही. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेमध्ये जात आहे. मात्र बँकेत जात नोटा जमा करण्याचे प्रमाण हे अत्यंत अल्प दिसून आले आहे. तसेच नागरिकांना नोटा जमा करताना […]

Untitled Design   2023 05 23T150205.859

Untitled Design 2023 05 23T150205.859

RBI Withdraws Rs 2000 Currency Note : आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून बाद केली आहे. सप्टेंबरनंतर दोन हजारांची नोट ही चलन म्हणून स्वीकारली जाणार नाही. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेमध्ये जात आहे. मात्र बँकेत जात नोटा जमा करण्याचे प्रमाण हे अत्यंत अल्प दिसून आले आहे. तसेच नागरिकांना नोटा जमा करताना कोणत्याही प्रकारची अडचण आले नसल्याचे देखील ग्राहक म्हणून लागले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या या नोटा त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

दरम्यान 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांनी बँकेमध्ये नोटा जमा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी नोटा जमा करण्यासाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. यातच पुन्हा एकदा दोन हजारांच्या नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे बँकेत या दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी नागरिक तसेच बँक खातेदार बँकेत गर्दी करू शकतात असा अंदाज बँकांनी लावला होता.

नोटबंदीची जुनी पार्श्वभूमी पाहता यावेळी बँकांनी मोठी खबरदारी घेतली. मात्र नागरिकांची तसेच ग्राहकांची अपेक्षित अशी गर्दी बँकांमध्ये झालीच नाही. तसेच जे नागरिक पैसे जमा करण्यासाठी बँकेत आले होते, त्यांची याबाबत प्रतिक्रिया घेण्यात आली. बँकेमध्ये पैसे जमा करताना कोणतीही अडचण आली नाही अशी माहिती काही नागरिकांनी दिली.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरे रवाना

आरबीआयने घेतलेल्या या निर्णयावर बोलताना काही नागरिकांनी सकारात्मक भूमिका मांडली. या निर्णयाला योग्य ठरवत आरबीआयच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होईल असे काहींचे म्हणणे आहे. तसेच नोटा जमा करण्यासाठी नागरिकांना कोणतीही अडचण येत नसल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Exit mobile version