Download App

Udhampur Attack : भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; उधमपूर हल्ल्याचा मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या

Udhampur Attack : भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाला आहे. जम्मू-कश्मीरमधील उधमपूर (Udhampur Attack ) या ठिकाणी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला लष्कर- ए- तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान याने केला होता. हा दहशतवादी लष्कर- ए- तोयबाचा म्होरक्या हाफिस सईद याच्या जवळचा मानला जातो. मात्र आता हंजला अदनानची हत्या करण्यात आली आहे.

Salman Khan : ‘ममतांचं घर माझ्या घरापेक्षा’.. सलमान खानच्या खुलाशाने सगळेच अवाक

उधमपूर हल्ल्याचा मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या

भारताच्या जवानांना मारणाऱ्या या दहशतवादी हंजला अदनानची पाकिस्तानातील कराचीमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्याच्या घराजवळच त्याला मारण्यात आले आहे. 2 डिसेंबरच्या मध्यरात्री ही हत्या करण्यात आली. तर हत्येनंतर अदनानच्या शरीरीत पिस्तुलाच्या चार गोळ्या सापडल्या आहेत.

CM शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातूनच 24 तासात 6 अल्पवयीन मुले बेपत्ता : तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान!

त्यानंतर पाकिस्ताने लष्करने त्याला गुप्तपणे रूग्णालयात दाखल केले होते. मात्र 5 डिसेंबरला त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याच्या या हत्येमुळे भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाला आहे. तसेच तो 26 /11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर- ए- तोयबाचा म्होरक्या हाफिस सईद याच्या जवळचा मानला जातो. तोच उधमपूर हल्ल्याचा मास्टरमाईंड दोखील होता.

उधमपूर हल्ल्याचा मास्टरमाईंड…

2015 मध्ये जम्मू-कश्मीरमधील उधमपूर या ठिकाणी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्यामध्ये दोन जवान शहीद झाले होते. तर 13 कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर 2016 मध्ये देखील जम्मू-कश्मीरच्याच पंपोर भागात केंद्रीय राखील पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. या दोन्ही हल्ल्यांच्या मुख्य सुत्रधार हंजाल अदनान हाच होता.

Tags

follow us