Download App

भाजपशासित MP मध्ये संतापजनक घटना; रक्ताने माखलेली ‘ती’ अर्धनग्न अवस्थेत भटकत होती पण..,

Ujjain Rape Case : भाजपशासित मध्यप्रदेश राज्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पीडित 12 वर्षीय मुलगी रक्ताने माखलेल्या अर्धनग्न अवस्थेत भटकत होती, मात्र तिची मदत करण्यास कोणी पुढं आलं नाही. याउलट तिचा अशा अवस्थेतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर आलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विश्लेषण : कचऱ्यातून पैसा! भारताच्या इकॉनॉमीला बूस्टर देणारं Waste Economy नेमकं काय?

एका सीसीटीव्ही फुटेजनूसार रक्ताने माखलेली पीडित मुलगी अर्धनग्न अवस्थेत भटकत होती, आपल्या अंगावर असलेल्या जेमतेम कपड्याने पीडिता आपलं अंग झाकत होती, जो तिच्या समोर येईल त्याच्याकडे ती मदत मागत होती मात्र, कोणीही तिची मदत करण्यासाठी पुढे आलं नसल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. अखेर पोलिसांनी पीडिता आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Ajit Pawar : अजितदादा येताच पडळकर गायब; फडणवीसांच्या घरी नक्की काय घडलं?

सध्या पीडित मुलीवर इंदोरमधील रुग्णालयात उपचार सुरु असून पीडित मुलीच्या गुप्तांगावर जखमा झाल्याचं समोर आलं आहे. गुप्तांगामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडितेची प्रकृती चिंताजनक झाली होती. सध्या तिची प्रकृती बरी असून पोलिसांकडून विचारपूस करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री मोठा की सचिव मोठा? कांदा प्रश्न बैठकीत उपस्थितांना पडला प्रश्न

पीडित मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील असून गरीबीला कंटाळून ती घर सोडून आली असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. या प्रकरणी महाकाल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे.

Shekhar Kapoor यांच्या ‘मासूम द नेक्स्ट जनरेशन’ मधून उलगडणार भावनाची अनोखी गोष्ट

या घटनेनंतर मध्य प्रदेशात एकच खळबळ माजली असून पोलिसांकडून महाकाल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याच काम सुरु आहे. या तपासात पोलिसांना इंदूर नागदा बायपासवरील हार्ट स्पेशल कॉलनीजवळ काही पुरावे मिळाले आहेत. फुटेजमध्ये एका रिक्षामध्ये पीडिता बसल्याचं दिसून येत आहे. त्यानूसार रिक्षाचालकाची चौकशी सुरु असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजवरुन पीडित मुलगी मध्यप्रदेशातील महाकालमध्ये कशी पोहचली? तिच्यासोबत कोणी गैरवर्तन केलं? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Tags

follow us