Download App

‘… याचा दोषही समान नागरी कायद्याला देणार?’, ओवेसींचा मोदी सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Asaduddin Owaisi on Uniform Civil Law : भोपाळमध्ये मंगळवारी (२७ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी समान नागरी कायद्याचे (Uniform Civil Law) जोरदार समर्थन केले. तसेच समान नागरी कायद्यावरून अल्पसंख्यांक समाजाला विरोधकांनी भडकवल्याबद्दलल त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. दरम्यान, शुक्रवारी (३० जून) ऑल एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी पीएम मोदींना यूसीसीबाबत अनेक प्रश्न विचारले. (uniform civil code asaduddin owaisi asked question pm modi overucc muslim congress)

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केले की, पंतप्रधान मोदी म्हणतात की मुस्लिमांचा एक गट पसमांदा मुस्लिमांना पुढे जाऊ देत नाही, परंतु सत्य हे आहे की सर्व मुस्लिम गरीब आहेत. उच्चवर्गीय मुस्लिम हा इतर मागासवर्गीय (ओबीसी) हिंदूपेक्षाही गरीब आहे. नरेंद्र मोदी हे सर्व भारतीयांचे पंतप्रधान आहेत, पण त्यांनी अल्पसंख्याक कल्याण बजेटमध्ये 40 टक्क्यांनी कपात का केली? असा सवाल ओवेसी यांनी केला.

ओवेसी पुढे म्हणाले की, सरकार दलित मुस्लिमांसाठी अनुसूचित जाती आरक्षणाला (SC) विरोध का करत आहे? मागासलेल्या मुस्लिमांच्या आरक्षणाला भाजप का विरोध करत आहे? या सामाजिक अन्यायासाठी ते UCC ला जबाबदार धरणार का? असा सवाल करत भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून सरकारनं पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करू नाही, हा भाजपचा अजेंडा असून समान नागरी कायदा लागू झाल्यास पर्सनल लॉ अस्तित्व संपू शकतं, असं ते म्हणाले.

ओवेसींनी केला काँग्रेसचा उल्लेख
ओवेसी म्हणाले, “काँग्रेस आणि इतर सामाजिक न्यायाची अपेक्षा करणाऱ्या पक्षांनीही सांगावे की आम्हाला आमचा न्याय्य वाटा मिळेल का? की तुमच्या नेत्याने इफ्तार पार्टीत टोपी घातली याचाच फक्त आनंद मानायचा?

काय म्हणाले पीएम मोदी?

भोपाळमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात पीएम मोदी म्हणाले होते, समान नागरी संहितेच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचे काम केले जात आहे. एका कुटुंबामद्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम असतील तर ते कुटुंब पुढं कसं जाईळ? देशात समान नागरी कायद्यासाठी सुप्रीम कोर्ट प्रयत्न करत आहे. पण, व्होट बॅंकसाठी काही लोक या कायद्याला विरोध करत आहेत. ते पुढे म्हणाले की, मुस्लिम मुलींवर ‘तिहेरी तलाक’चा फास लटकवून काही लोकांना त्यांचा कायमचा छळ करण्याचा मोकळा हात हवा आहे. हे लोकही तिहेरी तलाकचे समर्थन करतात.

Tags

follow us