नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी (Railway Budget) 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2013 वर्षाच्या तुलनेत 9 पटीनं बजेट वाढवले असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आर्थिक वर्ष 2023-24साठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. देशात 100 नव्या महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
● अडीच हजार कोटी रुपये राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करत सहकार क्षेत्राला मदत
● नॅशनल डिजिटल लायब्ररी उभारली जाणार
● मस्त्य योजनेत 6 हजार कोटी रुपये दिले जाणार
● 15 हजार कोटी रुपये पुढील 3 वर्षांसाठी शेड्युल ट्राइब योजनेसाठी दिले जाणार
● गरीब लोकांना बेल मिळताना आर्थिक अडचणी येतात, त्यांना देखील मदत केली जाणार
● पीएम आवास योजनेचा फंड 66 टक्क्यांनी वाढवला, 79 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार
● कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठीचा निधी 33 टक्क्यांनी वाढवत 10 लाख कोटींपर्यंत वाढवला
● रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचे बजेट
● 2013 साल विचार करता 9 पटीनं बजेट वाढवलं