Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर (Union Budget 2025) केला आहे. पगारदारांसाठी तब्बल बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. तर रेल्वेसाठी खर्च वाढविण्यात आला नाहीत.
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तरीही गुंतवणूकदार नाराज; ‘हे’ आहे कारण
तर संरक्षण क्षेत्रासाठी नऊ टक्क्यांनी तरतूद वाढविण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी 6 लाख 81 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री यांनी कमाईचा आणि खर्चाचा संपूर्ण हिशेब बजेटमध्ये सादर केला आहे. तुम्हाला माहिती आहे का भारताला पैसा कुठून मिळतो? शेवटी, संपूर्ण देश चालवणारे सरकार या खर्चासाठी स्वत:चे पैसे कोठून कमवते? जाणून घेऊया…
74 मिनिटे भाषण अन् चक्क 51 वेळा ‘टॅक्स’ तर 26 वेळा ‘टीडीएस’ चा उल्लेख, अर्थमंत्र्यांनी कोणता शब्द किती वेळा उच्चारला?
रुपया कसा येणार ?
24 पैसे-कर्ज
22 पैसे-प्राप्तीकर
18 पैसे-जीएसटी व इतर कर
17 पैसे-कार्पोरेट कर
9 पैसे कर सोडून इतर प्राप्ती
5 पैसे-केंद्रीय उत्पादन शुल्कातून
4 पैसे- सीमा शुल्कातून
1 पैसे- कर्ज नसलेल्या भांडवली पावत्यांमधून
——————-
रुपया कसा जाणार ?
22 पैसे -कर व शुल्कात राज्यांचा वाटा
20 पैसे-व्याज देणे
16 पैसे -केंद्र योजना
8 पैसे-संरक्षण
8 पैसे-वित्त आयोग व इतर
8 पैसे-केंद्रीय योजना
8 पैसे-इतर खर्च
6 पैसे-अनुदान
4 पैसे-पेन्शन
स्वस्त काय झालं?
टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार
मोबाईल च्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री
भारतात बनवलेले कपडे स्वस्तात विकले जाणार.
6 जीवरक्षक औषधे स्वस्त होतील.
वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार.
82 वस्तूंवरील उपकर काढला जाणार
काय महाग होणार?
अर्थसंकल्पात अनेक वस्तू स्वस्त होतील, असं प्रस्तावित करण्यात आलंय. तर काही गोष्टींवर कर वाढण्याची शक्यता आहे, सरकारने अद्याप याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आणि आता KCC मर्यादा 5 लाख रुपये करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा केवळ 3 लाख रुपये होती.