74 मिनिटे भाषण अन् चक्क 51 वेळा ‘टॅक्स’ तर 26 वेळा ‘टीडीएस’ चा उल्लेख, अर्थमंत्र्यांनी कोणता शब्द किती वेळा उच्चारला?
Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज लोकसभेत 2025 साठी अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला आहे. त्यांनी या बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देत टॅक्समध्ये मोठी सवलत दिली आहे. त्यांच्या 1 तास 14 मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील अनेक घोषणा केल्या आहे.
तर दुसरीकडे 1 तास 14 मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी 51 वेळा टॅक्स आणि 26 वेळा टीडीएस/टीसीएसचा उल्लेख केला. याच बरोबर कस्टम आणि करदात्याचा उल्लेख 22 वेळा तर भारताचा उल्लेख 21 वेळा आणि वैद्यकीय, सुधारणा आणि शेतकरी यांचा उल्लेख 20 वेळा, निर्यात 17 आणि एमएसएमईचा उल्लेख 15 वेळा केला आहे.
तसेच या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारमण यांच्याकडून बिहारचा 8 वेळा आणि ईशान्य भागाचा 5 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. याच बरोबर त्यांनी या भाषणात पायाभूत सुविधा, जलसंपदा, वस्त्रोद्योग, गुंतवणूक, बँकिंग आणि स्टार्टअप्सशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा केली. तर त्यांनी युवा, कौशल्य आणि उत्पादन हे शब्द 11 वेळा वापरले.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
एकूण भाषण कालावधी: 74 मिनिटे (दुसरे सर्वात लहान भाषण)
सर्वाधिक उल्लेख केलेला शब्द :
टॅक्स : 51 वेळा
टीडीएस/टीसीएस: 26 वेळा
एमएसएमई, शेतकरी आणि निर्यातीवर लक्ष एआय/रोबोटिक्स, ईव्ही बॅटरी, अणुऊर्जेला प्राधान्य
बिहार आणि ईशान्येसाठी विशेष योजना
याशिवाय, सीमाशुल्क (22 वेळा), करदाते (22 वेळा), वैद्यकीय (20 वेळा), सुधारणा (20 वेळा) आणि शेतकरी (20 ) वेळा उल्लेख तर नियोजन (18 वेळा), निर्यात 17 वेळा, एमएसएमई 15 वेळा, गुंतवणूक 13 वेळा, बँक 13 वेळा, युवा 13 वेळा, बजेट 11 वेळा, कौशल्य 11 वेळा, जहाज 11 वेळा, अर्थव्यवस्था 11 वेळा, उत्पादन 11 वेळा, “इन्फ्रास्ट्रक्चर” हा शब्द 10 वेळा आणि “मोदी” हा शब्द 10 वेळा उच्चारला गेला. तसेच शिक्षण, उद्योजकता, ईशान्य, पीपीपी, विमानतळ, एआय/रोबोटिक्स, एफडीआय, आयआयटी आणि कर्करोग यासारखे शब्दांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
अर्थसंकल्प जाहीर.. रेल्वेला अर्थमंत्र्यांकडून दे धक्का! गुंतवणूकदारांना शेअर बाजारात बसला फटका
रेल्वेसाठी 2.55 लाख कोटी रुपयांची तरतूद
यंदा रेल्वेसाठी 2.55 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 3445 कोटी रुपये महसुलावर आणि 2,52,000 कोटी रुपये भांडवली खर्चावर खर्च होणार आहे. तर पेन्शन फंडात 66 हजार कोटी रुपये, नवीन लाईन टाकण्यासाठी 32,235 कोटी रुपये तसेच या मार्गांच्या दुपदरीकरणासाठी 32,000 कोटी रुपये आणि त्यांचे गेज लाईन्समध्ये रूपांतर करण्यासाठी 4,550 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.