Union Budget 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज शनिवार (दि. १ फेब्रुवारी)रोजी तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. (Union Budget) अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. सीतारामण सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासह त्या सीतारमण माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी वेगवेगळ्या काळात सादर केलेल्या १० अर्थसंकल्पांच्या विक्रमाच्या जवळ पोहचतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प मांडणार; अनेक मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार वार
२०१९ मध्ये सीतारमण भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले. तेव्हापासून सीतारमण यांनी सात अर्थसंकल्प सादर केले आहेत. स्वतंत्र भारताचा पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाचे पहिले अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि नंतर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री म्हणून एकूण १० अर्थसंकल्प सादर केले.
पहिला टप्पा १३ फेब्रुवारी
२०२५ च्या अर्थसंकल्पात कमकुवत आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी आणि महागाई आणि स्थिर वेतन वाढीशी झुंजणाऱ्या मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या जाण्याची अपेक्षा आहे. शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ४ एप्रिल या कालावधीत दोन टप्प्यात चालेल. पहिला टप्पा १३ फेब्रुवारी रोजी संपेल आणि दुसरा सत्र १० मार्चपासून सुरू होईल.
आर्थिक सर्वेक्षण सादर
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा आर्थिक आढावा सादर केला. हे चालू आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन करते आणि देशासमोरील आव्हानांचे वर्णन करते. आर्थिक सर्वेक्षण हा केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून सादर केलेला वार्षिक दस्तऐवज आहे. हे सुधारणा आणि विकासासाठी एक ब्लूप्रिंट देखील प्रदान करते.