कॉंग्रेसच्या काळातील पेपरफुटीवर का बोलत नाहीत? जे.पी. नड्डा यांचा खोचक टोमणा

कॉंग्रेसच्या काळातील पेपरफुटीवर राहुल गांधी का बोलत नाहीत? असा खोचक टोमणा केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी केला आहे.

J.P. Nadda

J.P. Nadda

J.P.Nadda On Rahul Gandhi : कॉंग्रेसच्या काळातील पेपरफुटीवर राहुल गांधी का बोलत नाहीत? असा खोचक टोमणा केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लगावलायं. दिल्लीत आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारानंतर संसदेत नीट पेपर लिकच्या मुद्द्यावरुन आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ घातला. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतरच नीटच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचा पवित्रा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी घेतला. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना चर्चेसाठी पुन्हा आवाहन केलंय.

सोमवारची भीतीच संपली; ॲमेझॉनची 35 लाखांची नोकरी सोडून व्यवसायात उतरलेल्या तरुणीची कहाणी

पुढे बोलताना जे.पी. नड्डा म्हणाले, विरोधकांनी राजकारण सोडून समाजकारणावर चर्चा केली पाहिजे. आम्ही सभागृहात चर्चेसाठी तयार आहोत. राहुल गांधींनी पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकारण करु नये. कॉंग्रेसच्या सरकारमध्येही पेपरफुटी झाली, परंतू राहुल गांधी त्यावर बोलत नाहीत? विद्यार्थ्यांचं हित हा गांधी यांचा उद्देश नसून पेपरफुटीवर राहुल गांधी राजकारण करत असल्याचा आरोप नड्डा यांनी केला आहे.

नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करताना राहुल गांधी यांना पोलिसांनी फरफटत नेलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अमानूषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. या संपूर्ण घडामोडींनंतर राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार गांधी यांनी परिषदेतून पंतप्रधान मोदी यांनी माफी मागून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीयं.

Exit mobile version