India Pakistan Conflict : भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून (Operation Sindoor) लष्करी कारवाईत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. आता खास (India Pakistan Conflict) रणनिती तयार करून पाकिस्तानला जगात उघडं पाडण्याचा प्लॅन भारत सरकारने केला आहे. मोदी सरकारच्या या प्लॅनमध्ये फक्त भाजपाचेच खासदार नाहीत तर आणखीही काही विरोधी पक्षांचे खासदार यात आहेत. आता हे खासदार विविध देशांत जाऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बुरखा फाडण्याचं काम करणार आहेत. या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळात उद्धव ठाकरे शिवसेनेच्याही एका खासदाराचा समावेश आहे. खासदार प्रियंका चतु्र्वेदी यांचा या प्रतिनिधीमंडळात समावेश करण्यात आला आहे. आता चतुर्वेदी यांची एन्ट्री या प्रतिनिधीमंडळात कशी झाली याची माहिती समोर आली आहे.
खरंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात सोमवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर पक्षाने निर्णय घेतला. ठाकरे गटाने म्हटले आहे की प्रतिनिधीमंडळ म्हणजे काही राजकारण नाही. दहशतवादाविरोधात भारताची काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी या मंडळाचं काम आहे. देशासाठी जे काही योग्य असेल आणि गरजेचं असेल तेच आम्ही या प्रतिनिधीमंडळाच्या माध्यमातून करू असे आश्वासन सरकारला दिल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले.
PM मोदींचा विचार पक्का! पाकविरुद्धच्या प्लॅनमध्ये थरूर अन् ओवैसी; पण का? जाणून घ्याच..
पक्षाचं म्हणणं आहे की पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) सर्व राजकीय पक्षांनी दहशतवाद विशेष करुन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात लढाईसाठी पंतप्रधानांना पाठिंबा दिला आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध आम्ही सैन्याच्या (Indian Army) बरोबर आहोत. यात कोणताही किंतु परंतु असण्याचं काहीच कारण नाही.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर (Pakistan) भूमिका स्पष्ट करताना ठाकरे गटाने म्हटले आहे की कूटनितीक स्थिती आणि पहलगाममध्ये अपयशी ठरलेल्या गुप्तचर तंत्राबाबत आमचं मत आहे. देशाच्या हितामध्ये आम्ही प्रश्न विचारत राहू. परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगासमोर आणण्यासाठी जागतिक पातळीवर एकत्र येण्याची गरज आहे.
या मुद्द्यावर आपण सर्व एकजूट आहोत पण अराजकता आणि गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी प्रतिनिधीमंडळाच्या बाबतीत पक्षाला व्यवस्थित माहिती देण्याच्या प्रोटोकॉलचे पालन केले जाऊ शकते. काल फोन आल्यानंतर आम्ही राष्ट्रीय हितासाठी आवश्यक अशा कोणत्याही कार्यवाहीसाठी समर्थन दिलं आहे असे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीही आम्ही केली आहे असेही ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे.
मोठी बातमी! प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोप
सोमवारी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याशीही चर्चा केली होती. यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने खासदार अभिषेक बॅनर्जी यांना प्रतिनिधीमंडळात पाठविण्यास होकार दिला होता. याआधी टीएमसीने खासदार युसूफ पठाणचं नाव दिलं होतं. परंतु, युसूफ पठाणने नकार दिला होता.