Nitin Gadkari : प्रत्येक विधानसभेवेळी आमदार आयात करणाऱ्या प्रदेश भाजपला आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी खडे बोल सुनावले. ‘संघर्षातून निर्माण झालेला कार्यकर्ता निःस्वार्थीपणे पक्षाचं काम करू शकतो. (Nitin Gadkari) पक्ष वाढवण्यासाठी आणि निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत जायला हवं, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा असं प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केलं. (BJP) भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
महायुती भक्कम! काँग्रेसची आठ मतं फुटल्याने मविआ ला तडे; जयंत पाटीलही पराभूत
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे येथे सामान्य कार्यकर्ताही पंतप्रधान बनू शकतो आणि हीच भाजपची वेगळी ओळख आहे. ती कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी प्रयत्न करावेत, असंही गडकरी म्हणाले. दरम्यान, राज्याचा विकास करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न केले जातील. विकासाला चालना दिली जाईल, देश विकसित होत असताना गोवाही विकसित होत जाईल, तो मागे पडणार नाही. येत्या पाच वर्षात ५० हजार कोटी रुपयांची कामे राज्यात केली जातील, असं आश्वासन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.