…तर असं पावरफुल शिलाजीत देऊ की, बस्स; मिश्किल टीपण्णी करत Nitin Gadkari मुनगंटीवारांसाठी मैदानात

…तर असं पावरफुल शिलाजीत देऊ की, बस्स; मिश्किल टीपण्णी करत Nitin Gadkari मुनगंटीवारांसाठी मैदानात

Nitin Gadkari on Sudhir Mungantiwar : लोकसभेच्या निवडणुकीच्या ( Lok Sabha Elections ) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांच्या प्रचार सभांना जोर आला आहे. यामध्ये भाजपचे नागपूरचे उमेदवार आणि स्टार प्रचारक नितिन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत बोलताना गडकरींनी एक मिश्किल टीपण्णी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

दुध उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा! नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६१ कोटीचं अनुदान

या सभेत बोलताना गडकरी म्हणाले की, तुम्ही फक्त एकदा मुनगंटीवारांना निवडून द्या. मग पाच वर्षात बघा ट्रिपल इंजिन लागल्यानंतर कसा करंट लागेल आणि या मतदारसंघाचा विकास चार पटीने होईल. हे ट्रिपल इंजिन म्हणजे मुनगंटीवार यांच्या मागे मोदींची ताकद माझी ताकद असणार आहे.कारण मैं जो बोलता हूं वही करता हूं और जो करता हू वही बोलता हू. तुम्ही मुनगंटीवारांना निवडून द्या आम्ही असं पावरफुल शिलाजीत देऊ की, बस विकासाची काम एकदम जोरात होतील. अशी मिश्किल टीपण्णी करत गडकरींनी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकवला.

नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! आनंदराज आंबेडकर पुन्हा लोकसभेच्या रिंगणात

तसेच यावेळी बोलताना गडकरी यांनी राज्यातील आमदारांना विकास कामांऐवजी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. असं देखील म्हणाले आहेत. मी 10 वर्षांत 50 लाख कोटींची कामं केली आहेत. पण अनेकदा आमदार त्यांच्या मतदारसंघातील कामं थांबवतात. मी त्यांच्याशी त्याबाबत बोललो असता ते म्हणाले की, विकास बिकास सब भकास. पहले माल दो फिर काम लो. असं म्हणत त्यांनी विरोधकांवर एकप्रकारे निशाणा साधला आहे.

तर दुसरीकडे प्रचारादरम्यान बोलताना काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चंद्रपूर भाजपचे उमेदवार काँग्रेस हे लक्ष्मीदर्शन करून कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत आहेत. त्यामुळे मतदारांनी लक्ष्मी स्वीकारावी आणि मतदान करावे, असे वादग्रस्त विधान धानोरकर यांनी केले. इंपेरियल पॅलेसमध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा झाला. यावेळी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज