नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! आनंदराज आंबेडकर पुन्हा लोकसभेच्या रिंगणात

नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! आनंदराज आंबेडकर पुन्हा लोकसभेच्या रिंगणात

Anandraj Ambedkar Amravati Lok Sabha contest : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघाची. नवनीत राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील संघर्षामुळं हा मतदारसंघ कायम चर्चेत आहे. दरम्यान, या मतदारसंघात पुन्हा एक ट्विस्ट आला. रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता त्यांनी आपला हा निर्णय मागे घेत निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं.

बच्चू कडूंचा महायुतीला आणखी एक धक्का, अकोल्यात वाढवलं अभय पाटलांना बळ! 

अमरावतीतून निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा मागे घेत आनंदराज आंबेडकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. तसेच वंचितने दिलेला पाठिंबाही त्यांनी स्वीकारला आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या या निर्णयामुळे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचं टेन्शन वाढलं आहे.

फरार उद्योगपती विनोद खुटेंप्रकरणी ईडी अहमदनगरमध्ये मोठी कारवाई; कोट्यवधींची मलमत्ता जप्त 

आनंदराज आंबेडकर म्हणाले की, मी दोन दिवसांपूर्वी निवडणूक लढवणार नाही असे सांगून माघार घेतली होती. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी निवडणूक लढवत आहे. आंबेडकरी उमेदवार नसल्याने मत कोणाला द्यायचे असा प्रश्न जनतेसमोर होता. त्यामुळेच मी माझी उमेदवारी कायम ठेवत आहे. मी ही निवडणूक ताकदीने लढणार असल्याचे जाहीर करतो. तसेच वंचितनेही मला पाठिंबा दिला आहे आणि मला तो मान्य असल्याचं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं.

पुढं बोलतांना ते म्हणाले की, मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर लोकांनी असंतोष व्यक्त केला. काहींनी आत्मदहनाचा इशारा दिला. त्यामुळेच लोकांच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

सध्या संविधान आणि लोकशाही तोडण्याचे काम सुरू आहे. तसंच कोणीतरी बोलणारा उमेदवार लोकसभेत जावा म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. मूळ निवासी आदिवासी बांधवांवर होत असलेला अन्यायहोत आहे, तो दूर करायचा आहे. आज अमरावतीत महिला खासदार असूनही मेळघाटात एक महिला रस्त्यावरच बाळाला जन्म देत आहे, हे दुर्दैव आहे. पेसा कायदा मेळघाटात लागू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असंही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

इंदू मिलचे काम माझ्यामुळे सुरू झाले आहे, त्यामुळे माझे काम किती आहे हे सांगण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा लढणार असल्यानं अमरावतीत तिरंगी लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube