महायुतीत शिंदे गटाचं वजन वाढलं, आंबेडकर अन् DCM शिंदेची हातमिळवणी

महायुतीत शिंदे गटाचं वजन वाढलं, आंबेडकर अन् DCM शिंदेची हातमिळवणी

Shiv Sena Republican Sena alliance : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde)  एक मोठी राजकीय खेळी खेळली आहे.  शिंदे गटाने आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती केली. एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. यावेळी दोघांनीही हातात हात घेत सर्वांना अभिवादन केलंय. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणाबाजी केली.

पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर; पैसे द्या नाहीतर बुधवार पेठेत जाता म्हणून बदनामी करू, दोघांना अटक 

महापालिका एकत्र लढणार
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही दोघेही आमची युती झाल्याचे जाहीर करतो. सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. रस्त्यावर अन्याय विरोधात लढणारे सेना आहेत. एक बाळासाहेबांच्या विचारांच्या वारसा घेऊन चालणारी सेना तर दुसरी बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमच्या दोघांचेही चांगले चालेल, असं ते म्हणाले. तसेच दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले.

सत्तेत वाटा मिळाला पाहिजे…
तर आनंदराज आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात खरं म्हणजे ही युती आजची नाही. तर बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली ही युती आहे. मी एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून उल्लेख करतो. कारण, शिंदेंनी रस्त्यावर लढाई लढली आहे.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना ग्रांऊड लेव्हला जाऊन काम केलं आहे, असंही ते म्हणाले.

आधी शुगर बोर्ड आता ऑइल बोर्ड, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नवी आयडीया; CBSE बोर्डाचा आदेश काय? 

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक चांगल्या योजना आल्या, शोषित, वंचित आणि गरिबांसाठी त्यांनी केलेलं काम चांगल आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अटीशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घ्या, अशी विनंती आम्ही केली असून त्यांनी ती मान्य केल्याचंही आंबेडकर म्हणाले.

तसेच रस्त्यांवरील कार्यकर्त्यांना आजवर काही मिळाले नाही, पण आता आगामी पालिका निवडणुकीत सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय़ घेतला, असं आनंदराज आंबडेकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube