… तर जरांगे अन् एकनाथ शिंदेंना जागा दाखवणार; ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा इशारा

… तर जरांगे अन् एकनाथ शिंदेंना जागा दाखवणार; ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा इशारा

Navnath Waghmare On Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करत आहे. ऑगस्ट महिन्यात जरांगे पाटील आरक्षणासाठी मुंबईत (Mumbai) आंदोलन करणार आहे. तर आता जरांगे मुंबईत ज्या मैदानात आंदोलन करणार त्याच मैदानात आम्हीही आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेता नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी दिला आहे. याच बरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर मनोज जरांगे पाटील यांना मदत केली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवणार असं देखील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे म्हणाले की, जरांगे मुंबईत ज्या मैदानात आंदोलन करतील त्याच मैदानात आम्हीही आंदोलन करु पण जरांगे यांच्यात दम असेल तर त्यांनी मुंबईत जाऊनच दाखवावं असं आव्हान माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटील यांनी दिले आहे. तर जरांगेंशी आम्ही दोन हात करायला तयार आहोत मात्र ओबीसींवर अन्याय कराल तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा देखील वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला दिला आहे.

तर माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील इशारा दिला आहे. जर उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना सपोर्ट केला तर आम्ही निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं सांगत त्यांनी राज्यातील ओबीसी समाज एका पायावर मुंबईत जायला तयार आहे. असं देखील वाघमारे यांनी म्हटले आहे.

“..तर तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल”, CM फडणवीसांच्या विश्वासू आमदाराला ठाकरेंची ऑफर

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी मराठा समाजाला त्यांनी मुंबईत दाखल होण्याचे आवाहन देखील केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube