बच्चू कडूंचा महायुतीला आणखी एक धक्का, अकोल्यात वाढवलं अभय पाटलांना बळ!
Bachchu Kadu Support Abhay Patil: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार पक्षाने अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात भूमिका घेत स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवला. तर आता अकोल्यातही कॉंग्रेसचे उमेदवार अभय पाटील (Abhay Patil)यांचं प्रहारने बळ वाढवलं.
रवींद्र भारतीला सेबीचा झटका, 12 कोटींचा ठोठावला दंड, बाजारातही बंदी
बच्चू कडू यांनी रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा दिला. तर आता अकोल्यात प्रहारच्या जिल्हा मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीने काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची मागणी बच्चू कडूंकडे केली. बच्चू कडू देखील कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून अकोल्यात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतील, असे संकेत आहेत.
फरार उद्योगपती विनोद खुटेंप्रकरणी ईडी अहमदनगरमध्ये मोठी कारवाई; कोट्यवधींची मलमत्ता जप्त
…म्हणून अभय पाटलांना पाठिंबा
अकोल्यातील भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून प्रहारला पाहिजे तसा सन्मान आणि वागणूक दिला जीत नाही, याचा रोष प्रहारच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. म्हणून रणधीर सावरकर यांच्यामुळे या निवडणुकीत स्थानिक प्रहार पक्ष काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसू यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशुखांनी प्रहारच्या या निर्णयाचे स्वागत केलं. कडू हे नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणार आहेत. बच्चू कडू यांच्या संभाव्य निर्णयामुळे अकोल्यातील महाविकास आघाडीची बाजू भक्कम झाल्याचं देशमुख म्हणाले.
बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यांचा मोठा जनसंपर्क जिल्यात आहे. त्यामुळे अभय पाटील यांना याचा फायदा होऊ शकतो.
दरम्यान, अकोल्यात तिरंगी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील आणि भाजप (महायुती) कडून अनुप धोत्रे रिंगणात आहेत.