Download App

अतिक अहमदच्या हत्येनंतर आता मुख्यमंत्री योगींचा इशारा

Yogi Adidtyanath : उत्तर प्रदेशचे (UP) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रामचरितमानसमधील (Ramcharitmanas) एक दोहा वाचून गुन्हेगारांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत (Law and order)कडक इशारा दिला आहे.

कुटुंबाला सांगूनच पवारांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

रामचरितमानसच्या ओळींचं पठण करुन मुख्यमंत्री योगींनी गुन्हेगारांना कडक शब्दात इशारा दिला आणि हातवारे करत म्हणाले की, कर्म प्रधान विश्व रचि राखा, जो जस करही सो तस फल चखा. यावेळी ते पुढे म्हणाले की, काही लोकांनी प्रयागराजची भूमी अन्याय आणि अत्याचाराची भूमी बनवली होती.

प्रयागराजची भूमी कोणालाही निराश करत नाही. मागील कुंभ हा एक अनोखा कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे भाजपचा महापौर निवडून आला होता. कुंभचा कार्यक्रम आणखी भव्य होईल, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री योगी म्हणाले की, आज राज्यात कर्फ्यू नाही, दंगल नाही, उत्तर प्रदेशात सर्व काही व्यवस्थित झाले आहे, कारण सरकारची कारवाई ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर आहे. प्रयागराजची भूमी कोणालाही निराश करत नाही. गणेश केसरवाणी जिंकले, त्यामुळे येथे नवीन कामगारांची निर्मिती सुरु होईल. भारताबद्दलची जगाची धारणा आता बदलली आहे. आम्ही सक्षमीकरणाचे काम केले आहे.

ते म्हणाले, प्रयागराज हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. पूर्वी भीती आणि दहशतीच्या छायेखाली उत्सव भरायचा आणि लोक हादरायचे. दहशत पसरवणारे गुन्हेगार आता गळ्यात फलक घेऊन फिरत आहेत. प्रयागराज हे एक चकचकीत झाले आहे. प्रयागराज आता स्मार्टसिटी झाले आहे. दोन कोटी तरुणांना टॅब दिले आहेत. प्रयागराजाचा आगामी कुंभ मेळावा ऐतिहासिक होणार आहे. माफियांनी मोकळ्या केलेल्या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधली जाणार असल्याचं यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us