Download App

सपा-काँग्रेस आघाडीत धुसफूस! ‘त्या’ तीन जागांसाठी जोरदार रस्सीखेच; कोण मारणार बाजी?

उत्तर प्रदेशात दहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांत जागावाटप सुरू आहे.

UP Bypolls : उत्तर प्रदेशात दहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका (UP Bypolls) अटीतटीच्या होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत चांगलं (Lok Sabha Elections) प्रदर्शन केल्याने सपा आणि काँग्रेसचा आत्मविश्वास (Congress Party) वाढला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर देण्याचं दोन्ही पक्षांचं प्लॅनिंग आहे. मात्र जागावाटप दोन्ही पक्षांतील वादाच कारण ठरू लागलं आहे. तीन मतदारसंघ तर असे आहेत की दोन्ही पक्ष मागे हटायला तयार नाहीत. पश्चिम उत्तर प्रदेशातील मिरापूर, पूर्व उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि मजवां या मतदारसंघात कुणाचा उमेदवार असेल यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

तर दुसरीकडे निवडणुकीतील खराब कामगिरीतून धडा घेत भाजपने कार्यकर्त्यांना एकत्रित आणून निवडणूक लढण्यावर भर दिला आहे. काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने सर्व दहा जागांवर तयारी सुरू केली आहे. परंतु २०२२ मधील निवडणुकीत ज्या जागा सपाने (Samajwadi Party) जिंकल्या होत्या त्या जागांसाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न केले जात नाहीत. तसेच समाजवादी पार्टीकडून या जागा काँग्रेसला सुटण्याची सुतराम शक्यता नाही. समाजवादी पार्टी गाझियाबाद आणि खैर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास तयार आहे पण मिरापुर, फूलपुर आणि मजवां मतदारसंघ सोडण्यास तयार नाही असे समजते.

Uttar Pradesh Loksabha Election Result : भाजपला धक्काच! उत्तर प्रदेशात सायकल सुसाट पळाली

समाजवादी पार्टी अल्पसंख्यक बहुल मतदारसंघ काँग्रेसला देण्यास तयार नाही असा आरोप काँग्रेसच्या एका नेत्याने केला. मीरापूर मतदारसंघात अल्पसंख्यक आणि दलित मतदारांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी विजय मिळाला तर २०२७ मधील विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Elections 2027) फायदा मिळेल असे काँग्रेसला वाटते. सपा नेत्यांनी मात्र काँग्रेसचे दावे खोडून काढले आहेत. पोटनिवडणूकीची घोषणा झाल्यानंतर सपा उमेदवारांची घोषणा करण्यास तयार आहे असे एका सपा नेत्याने सांगितले. अल्पसंख्यक आणि दलित मतदार जास्त संख्येने मते देतील अशा मतदारसंघांत उमेदवार देण्याचे दोन्ही पक्षांचे प्रयत्न आहेत.

फुलपूर सपासाठी अजून तरी दूरच..

सन २०१२ मध्ये समाजवादी पार्टीला या मतदारसंघात विजय मिळाला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र पक्षाला विजयी कामगिरी कायम राखता आली नाही. मागील निवडणुकीत सपा उमेदवाराला २७०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता काँग्रेस या मतदारसंघासाठी प्रयत्न करीत आहे. कारण मुस्लिम मतदार आता पक्षाच्या पाठीशी ठाम उभा आहे असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. आता या जागावाटपात कुणाला त्याग करावा लागणार याचं उत्तर लवकरच मिळणार आहे.

Uttar Pradesh Loksabha : अयोध्येत भाजपला राम पावला नाही, समाजवादीची सायकल सुसाट 

follow us