Download App

UP Election Result 2023: योगी आदित्यनाथ यांनी सपा, बसपा आणि काँग्रेसला पुन्हा चितपट केले

UP Election Result 2023 : यूपी मधील नगरपालिका निवडणुकीचे (Municipal elections) निकाल आज जाहीर होत आहेत. त्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यूपीमधील 760 नगरपालिकांमध्ये 4 मे आणि 11 मे रोजी दोन टप्प्यात मतदान झाले होते. (UP Election Result 2023) पहिल्या टप्प्यात ५२ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ५३ टक्के मतदान झाले होते. यूपीच्या नागरी निवडणुका 2024 ची लिटमस टेस्ट मानली जात आहे. या निवडणुकांमध्ये भाजप, सपा, बसपा, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यूपीमध्ये 17 महानगरपालिका, 199 नगरपालिका आणि 544 नगर पंचायतीच्या जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 9 मंडलांतील 37 जिल्ह्यांतील 10 महानगरपालिका, 820 नगरसेवक, 103 नगरपरिषद अध्यक्ष, 2740 नगरपरिषद सदस्य, 275 नगर पंचायत अध्यक्ष आणि 3745 नगर पंचायत सदस्यांसाठी निवडणूक झाली आहे. दुसरीकडे, दुसऱ्या टप्प्यात 9 विभागांतील 38 जिल्ह्यांतील 7 महानगरपालिका, 95 नगरपालिका, 267 नगर पंचायती आणि नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक झाली.

यूपीच्या झाशीमध्ये चिरगाव नगरपालिकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध विजयी झाला आहे. याशिवाय 36 पालिका सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. आग्रा येथून 9 सदस्य, रामपूर आणि शामली येथून 4-4, सहारनपूरमधून 3, गोंडा, झाशी, मथुरा, लखीमपूर खेरी येथून 2-2, जालौन, फतेहपूर, फिरोजाबाद, महाराजगंज, संभल, सीतापूर, हरदोई येथून प्रत्येकी एक नगरपालिका सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे.

Karnataka Election : काँग्रेस नेत्याचा दावा! ‘या’ एकाच घोषणेनं केला भाजपाचा पराभव निश्चित

यूपीच्या नागरी निवडणुकांच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्ष अजूनही सपा आणि बहुजन समाज पक्षापेक्षा खूप पुढे होते. यूपीच्या 17 महानगरपालिकांपैकी भाजप 16 आणि बसपा एका जागेवर पुढे आहे. तर 199 नगर पालिका परिषदांवर भाजप-138, सपा- 40, बसपा- 22, काँग्रेस- 5 जागांवर आघाडीवर आहे. नगर पंचायतीबद्दल बोलायचे झाले तर भाजप 138, सपा 73, बसपा 35 आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे.

अयोध्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीशपती त्रिपाठी विजयी झाशीनंतर आता अयोध्या महापालिकेतही भाजपने महापौरपद काबीज केले आहे. यूपी भाजपने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, अयोध्या महानगरपालिकेत महापौरपदी विजयी झाल्याबद्दल श्री गिरीशपती त्रिपाठी यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags

follow us