Road Accident : उत्तर प्रदेशमध्ये (UP)भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जालौन (jalaun)जिल्ह्यातील मधौगढ (Madhougarh)पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालपुराजवळ बस उलटल्याने (Bus Accident) पाच जणांचा मृत्यू (Five death) झाला आहे. या अपघातात अनेक पाहुणे जखमी झाले आहेत. ही बस अज्ञात वाहनाच्या धडकेने पलटी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.
आधी शिवसेनेचं अस्तित्व उभं करा मग…; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना बाहेर काढून मधौगडमध्ये उपचारासाठी पाठवले आहेत. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. इराज राजा हेही घटनास्थळी पोहोचले.
रेंधार पोलीस ठाण्याच्या मडैला गावातून लग्नाची मिरवणूक घेऊन जाणारी बस रामपुरा पोलीस ठाण्याच्या दुतावली गावात आली होती. येथे लग्नाचे विधी आटोपल्यानंतर ही बस बारात्यांना घेऊन मडैला गावाकडे निघाली होती.
रेंढर क्षेत्र से एक बारात रामपुरा गई थी और वापस लौटते समय बस की अज्ञात वाहन से टक्कर हो गई। बस में 40 लोग सवार थे। 15 लोग घायल हुए हैं जिनमें से 5 लोगों की मृत्यु हो गई है। गंभीर रूप से घायल लोगों को मेडिकल कॉलिज रेफर किया जा रहा है। मामले में आवश्यक कार्रवाई की जा रही है: इराज… pic.twitter.com/LUt2wy1geO
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2023
पोलीस अधीक्षक डॉ. इराज राजा म्हणाले की, आम्हाला पहाटे 2 वाजता अपघाताची माहिती मिळाली. यानंतर तातडीने रुग्णवाहिका आणि पोलीस पाठवण्यात आले आहेत. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनाने पळ काढला. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.
मडेरा येथील रहिवासी मुलचरण पाल यांची दोन मुलं सुनील आणि प्रमोद यांचे लग्न रामपुरा येथील रामधानीच्या दोन मुली संध्या आणि उपासना यांच्याशी झाले होते. शनिवारी रात्री लग्नाला उपस्थित राहून सर्व वऱ्हाड बसने परत येत होते. यावेळी समोरुन अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी एकच राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांनी मोठ्या कष्टानं घटनास्थळी पोहचून बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी मधौगढ सामुदायिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. त्यानंतर जखमींपैकी पाच जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. त्याचवेळी गंभीर जखमींना मेडिकल कॉलेज ओराई येथे रेफर करण्यात आले आहे.