Download App

Big Breaking : उत्तर प्रदेशात भोले बाबा सत्संगात चेंगराचेंगरी; 27 जणांचा मृत्यू

फुलराईत भोले बाबा सत्संगात चेंगराचेंगरी झाली आहे. त्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यात एक पुरुष, 19 महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Uttar Pradesh Stampede At Bhole Baba Satsang In Hathras: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. फुलराई गावात भोले बाबा सत्संगात चेंगराचेंगरी झाली आहे. त्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यात 25 महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. इटाहचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेशकुमार त्रिपाठी यांनीही मृतांचा आकडा सांगतिला आहे. त्यात अनेक जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. तर मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.

तुम्हाला हे शोभत नाही; मोदींच्या भाषणात गोंधळ घालणाऱ्या राहुल गांधींना ओम बिर्लांनी खडसावले

धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याचे प्राथमिक कारण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिले आहेत. मृतांप्रती योगी आदित्यनाथ यांनी दुख: व्यक्त केले आहे.जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


एकनाथ शिंदेंचा विधानसभेत राहुल गांधींना टोला; ‘आलू डालो…सोना निकालो’

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, संदीप सिंह हे घटनास्थळी रवाना झाले आहे. तर राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकही घटनास्थळी रवाना झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

(बातमी अपडेट आहे)

follow us

वेब स्टोरीज